Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र भंडारा प्रकरण: शॉर्टसर्किटमुळे लागली आग; अग्निशमन यंत्रणेचा निष्कर्ष

भंडारा प्रकरण: शॉर्टसर्किटमुळे लागली आग; अग्निशमन यंत्रणेचा निष्कर्ष

भंडारा आग प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

Related Story

- Advertisement -

भंडार्‍यातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागली. यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही आग लागली. शिशु केअर युनिटला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने ही घटना घडली. या शिशु केअर युनिटमध्ये १७ बालके होती. यापैकी ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या रुग्णालयात लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. यासह रूग्णालयात अग्निशमन यंत्रणात अस्तित्वात नसल्याचेही अहवालात नोंदवण्यात आले आहे.

दरम्यान, भंडारा आग प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याने या आग प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलातील काही अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली आहे. तर नागपूर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने भंडाऱ्यात जाऊन चौकशी सुरू केली आहे. या आगीचे नेमके कारण तेथील अग्निप्रतिबंधक यंत्रणा, तसेच यावरील उपाययोजनेवर ही समिती काम करतेय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या तपासानंतर ही आग शॉर्टसर्किटमुळेच लागल्याचा प्राथमिक निष्कर्ष या समितीने नोंदवला आहे. रुग्णालयात आग विझवण्यासाठी आवश्यक असणारे स्प्रिंकर्स आणि हायड्रन्ट अस्तित्वात नसल्याचेही समोर आले आहे.

असे काढले समितीने निष्कर्ष

- Advertisement -

भंडारा आग प्रकरणासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले. त्यातील काही म्हणजे ही आग शॉर्ट सर्किटमुळेच लागली. या घटनेवेळी स्थानिक अग्निशमन दलाचे पथक वेळेत दाखल झाले, या रुग्णालय इमारतीला फायर एनओसी नव्हती यासह कोणतीही आग प्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध नव्हती, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण नव्हते.

- Advertisement -