घरमहाराष्ट्रमृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत : मुख्यमंत्री

मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत : मुख्यमंत्री

Subscribe

आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

भंडाऱ्यातील डास सामान्य रुग्णालयातील आगीत १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यूमुळे साऱ्या देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या बालकांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तीव्र हळहळ व्यक्त करण्यात आली असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडून दुर्घटनेतील पिडीत मृत बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढताहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीट व्यवस्थित झाले आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

- Advertisement -

या घटनेमुळं महाराष्ट्र हादरला असून सरकारी रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला असून तपासाचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून, यात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितले. याप्रकरणी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे सायंकाळी पाच वाजता रुग्णालयाला भेट देणार आहेत.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून राज्यातील अन्य सर्व रुग्णालयातील शिशू दक्षता विभागांचे तातडीनं ऑडिट करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना दिले आहेत.

 

- Advertisement -

 

 


हेही वाचा – भंडारा दुर्घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश; राहुल गांधींनी केलं मदतीचं आवाहन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -