Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Bhandara Hospital Fire: भंडारा दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गडकरी, राहुल गांधींनी व्यक्त...

Bhandara Hospital Fire: भंडारा दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गडकरी, राहुल गांधींनी व्यक्त केला शोक

Related Story

- Advertisement -

भंडारा दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. भंडाऱ्यातील दुर्घटना हृदय पिळवटणारी आहे, असं मोदींनी म्हटलं आहे. “भंडाऱ्यातील दुर्घटना हृदय पिळवटणारी आहे. आपण मौल्यवान जीव गमावले आहेत. पीडितांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत. दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो,” असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. “भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे. ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना,” असं नितीन गडकरी यांनी ट्वीट केलं आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी देखील शोक व्यक्त करत राज्य सरकारला मदतीचं आवाहन केलं आहे. “महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना वेदनादायी आहे. जीव गमावलेल्या मुलांच्या कुटुंबांबद्दल माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने सर्वोतोपरी मदत करावी, असं आवाहन मी करतो,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -