घरमहाराष्ट्रसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमात भीम आर्मीचा गोंधळ

संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात भीम आर्मीचा गोंधळ

Subscribe

'संभाजी भिडे मुर्दाबाद'च्या घोषणा देत भीम आर्मीनं संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. मुंबईतील शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

‘संभाजी भिडे मुर्दाबाद’च्या घोषणा देत भीम आर्मीनं संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. मुंबईतील शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी  शिवडीतील एका शाळेतील कार्यक्रमावेळी दलित पँथर आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे मुर्दाबाद म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. दोन वेळा असा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतले.  या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली होती. पण, पोलिसांनी कार्यक्रमाला सुरक्षा पुरवली. त्यानंतर हा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी भीम आर्मीचे दहा कार्यकर्ते कार्यक्रम स्थळी पोहचले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे कार्यक्रम स्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झाला होता. पण, पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

वाचा – ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडेंना जामीन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -