घरमहाराष्ट्रभोंदूबाबाची नियत फिरली; घेतला भक्ताचा गैरफायदा

भोंदूबाबाची नियत फिरली; घेतला भक्ताचा गैरफायदा

Subscribe

आजरी पतीचा उपचार करणाऱ्या त्या मांत्रिकाने असहाय्य पत्नीलाच आपली शिकार बनवलं

पुण्यात राहणारी एक महिला तिच्या आजारी पतीला उपचारासाठी एका मांत्रिकाकडे घेऊन गेली होती. यावेळी तिची आणि त्या मांत्रिकाची ओळख झाली. मात्र, कालांतराने या भोंदूबाबाची नियत फिरली आणि त्याने त्या हतबल महिलेलाच आपल्या वासनेची शिकार बनवलं. मांत्रिकाने त्या महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. पुण्याच्या येरवडा परिसरात धक्कादायक घटना घडली. 

 


वाचा : आईला मारले म्हणून मुलाने वडिलांना संपवले

काही दिवसांनी भोंदूबाबाने पीडित महिला आणि तिच्या पतीला नेहमीच्या ठिकाणी येण्याऐवजी स्वत:च्या घरी बोलावले. त्यावेळी ‘तुमच्या पतीच्या खाण्यामध्ये काहीतरी मिसळून त्यांना वश करण्यात आलं आहे आणि यातून त्यांची सुटका करण्यासाठी मला तुमच्या घरी येऊन उतारा टाकावा लागेल,’ असं या बाबाने पीडितेला सांगितलं. मात्र, ज्यावेळी मी तुमच्या घरी येईन तेव्हा तुझा पती तिथे नसला पाहिजे अशी अटही त्याने घातली. ठरल्याप्रमाणे पीडिता घरी एकटी असताना मांत्रिक त्यांच्या घरी आला आणि महिलेला पाण्यातून गुंगीचं औषध देऊन तिचा बलात्कार केला. त्यानंतर त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून होते नव्हचे तितके पैसे उकळले आणि तिथून पसार झाला. सध्या हा भोंदू मांत्रिक पोलिसांच्या ताब्यात आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -