Ayodhya Ram Mandir Live : राम सगळ्यांचे, राम सर्वांमध्ये आहेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरूवात


Ayoddhya : हे गेल्या ३० वर्षांच्या मेहनतीचं फळ – मोहन भागवत

अयोध्येमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी बोलताना ‘आजचा दिवस हे गेल्या ३० वर्षांचं फळ आहे’, असं ते म्हणाले. सविस्तर वृत्त

https://twitter.com/ANI/status/1290920201203126273

हा क्षण वास्तवात येण्यासाठी आपल्या कित्येक पिढ्या गेल्या. अनेकांनी आपलं बलिदान दिलं. शांततापूर्ण पद्धतीने एखाद्या मुद्द्यावर तोडगा कसा काढायचा, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारताला दाखवून दिले आहे – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 
https://twitter.com/ANI/status/1290916077224865792

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही पूज पार पडली. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते रम मंदिराची कोनशिला बनवण्यात आली.


राम जन्मभूमी स्थळावर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात हे भूमिपूजन केले जात आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ही पुजा पार पडत आहे.


पंतप्रधानांनी या परिसरात पारिजातकाचे झाड लावले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम लल्लाच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. त्यांनी रामाची आरती करून त्यांना प्रदक्षिणाही घातली.


पंतप्रधानांच्या हस्ते हनुमान गढ येथे आरती


शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत ठराविक लोकांना आमंत्रण दिल्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहेत. तसेच आता गेलो नसलो तरी येत्या काळात नक्कीच अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अयोध्येतील दृश्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत आगमन झाले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधानांसह सर्वांनी मास्क देखील परिधान केले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल


सरसंघचालक मोहन भागवत यांना राम मंदिराच्या भूमिपूजनाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. ते नुकतेच भूमिपूजन सोहळ्याच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये दाखल झाले असून अयोध्येपर्यंत चॉपरने ते प्रवास करणार आहेत.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि भाजप नेत्या उमा भारती अयोध्येत दाखल झाले. त्यांनी अयोध्येतील सोहळ्यांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.


नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाबाहेर रांगोळी काढून आनंद साजरा केला जात आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येसाठी दिल्लीहून रवाना झाले असून १०.४० मिनिटांनी त्यांचे हेलिकॉप्टर अयोध्येत दाखल होणार आहे.


कार्यक्रमासाठी व्यासपीठ सजले. भूमिपूजन सोहळ्यासाठी या व्यासपीठावर पंतप्रधानांसह पाच मान्यवर उपस्थित राहतील.


योगगुरू बाबा रामदेव हे भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले असून त्यांनी आज सकाळी हनुमानगढी येथे पूजा केली. आजचा दिवस ऐतिहासिक आहे आणि आज आपण रामराज्यात प्रवेश केला आहे, असेही रामदेव बाबा यावेळी म्हणाले.


Photo: भूमीपूजनापूर्वी अयोध्या लाखो दिव्यांच्या रोषणाईने लखलखली

ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. आज ५ ऑगस्टला मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याने रामाची नगरी सज्ज झाली आहे. यापूर्वी रात्री संपूर्ण अयोध्या दिव्यांनी आणि विद्युत रोषणाईने उजळली होती. येथे क्लिक करा फोटो पहा


राम मंदिर भूमीपूजनानिमित्त अयोध्येच्या सीमा सील; मोदींच्या कार्यक्रमापर्यंत कडेकोट सुरक्षा तैनात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२.३० वाजता हा सोहळा पार पडणार असून या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. मंदिर परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. या द्वारेच निमंत्रितांना भूमीपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान मोदींच्या हस्ते भूमीपूजन होईपर्यंत अयोध्येत एसपीजी (SPG) आणि एनएसजी (NSG) जवानांचा कडेकोट पहारा असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. सविस्तर वृत्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम जन्मभूमीवर राम लल्लाला पाळणा घालण्याचा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.


अमेरिकेतील वॉश्टिंगटन डीसीमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी राम जन्मभूमीच्या भूमिपूजन सोहळ्याचा आनंद परदेशातही साजरा केला.


अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम जन्मभूमीवर भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार असून यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षेच्या योजना करण्यात आल्या आहेत. जागोजागी पोलीस तैनाक केले असून कोरोना संकटात हा परिसरही निर्जंतुक करण्यात येत आहे.


अयोध्येतील राम मंदिराचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा आज होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२.४४ या शुभमुहुर्तावर भूमिपूजन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अगदी मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यातही मुख्य मंचावर केवळ ५ व्यक्तींना स्थान मिळणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा समावेश आहे.