घरमहाराष्ट्रपुण्यात सायकलींग करणाऱ्या भावंडांना कारने उडवले

पुण्यात सायकलींग करणाऱ्या भावंडांना कारने उडवले

Subscribe

पुण्यातील राजगुरूनगर परिसरात भरधाव कारने सायकलींग करणाऱ्या भावंडांना उडवले. दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

पुण्यातील राजगुरुनगर-भिमाशंकर रोडवर संगम गार्डन जवळ करंडे वस्ती येथे सायकलींग करणाऱ्या दोन चिमुकल्या भावडांना कारने उडवल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे. या अपघातामध्ये एका मुलाची प्रकृती चिंताजनक असून एक जखमी आहे. साई श्रीराम नेहेरे (वय १०) आणि ओम श्रीराम नेहेरे (वय १३) असे अपघातात जखमी झालेल्या भावडांची नावं असून साईची प्रकृती ताजनक आहे. विवरचा सुट्टीचा दिवस म्हटला की मुलांचा आनंदही द्विगुणीत होतो. मात्र खेळताना भान ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे. खेळता खेळता कारने उडवल्यामुळे या चिमुरड्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

वाहतुकदारांचे सुचनांकडे दुर्लक्ष

करंडेवस्ती येथे सकाळच्या सुमारास दोन मुलं सुट्टीच्या दिवसाचा आनंद घेत सायकल सवारी करत असताना भिमाशंकरच्या दिशेने जाणारी कार अचानक समोरून आली. कारने सायकलसह दोन्ही मुलांना उडवले. मोठी लोकवस्ती असलेल्या ठिकाणी वाहने सावकाश चालवावी, असे अनेक फलक असतात. मात्र अंमलबजावणी करताना कोणीही दिसत नाही. त्यामुळे अपघातासारख्या घटना घडतात. त्या दोन्ही भावडांना उपचारासाठी राजगुरुनगर येथील खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून राजगुरुनगर येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

- Advertisement -

महामार्गावर सायकलींग का?

भिमाशंकर रोडवर नेहमीच वाहतुकीची मोठी वर्दळ असते. भरधाव चालणारी वाहनं, रस्त्याच्या दुतर्फा असणारी वाहनांनी पार्किंग यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. असे असताना मुलांची या ठिकाणी सायकलींग करणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न या अपघातानंतर उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -