Bihar Election: या भीतीमुळे भाजपनं पांडेंना तिकीट देण्यास नकार दिला – अनिल देशमुख

बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर असताना बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना एका धक्का बसला आहे. संयुक्त जनता दलात कडून उमेदवारी मिळेल अशा भ्रमात असलेल्या गुप्तेश्वर पांडेंचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपने गुप्तेश्वर पांडे यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट देण्यास नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला टोला लगावला आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

गुप्तेश्वर पांडे यांना निवडणुकीचे तिकीट द्यावे की नाही हे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही विचारले होते की, भाजपचे नेते पांडणेचा प्रचार करतील का?. या प्रश्नाच्या भीताीमुळेच कदाचित त्यांना तिकीट देण्यात आले नसावे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.

गुप्तेश्वर पांडे सुशांतसिंह राजपूत प्रकरणामुळे चर्चेत आले होते. या प्रकरणावरून त्यांनी मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर आरोप केला होता. त्यादरम्यानचे गुप्तेश्वर पांडे राजकारणात प्रवेश करणार असल्याचा चर्चा सुरू झाल्या. मग यानंतर कालांतराने बिहार विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लगबगीने स्वेच्छानिवृत्ती घेत गुप्तेश्वर पांडे यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना जेडीयूचे तिकीट मिळणार असल्याचे निश्चित मानले जात होते. पण तसे काही झाले नाही. जेडीयूने पांडेंना उमेदवारी दिलेली नाही आहे. त्यामुळे पांडे यांचा राजकारण प्रवेशाचा प्रयत्न दुसऱ्यांदा फसला आहे. उमेदवारी न मिळाल्याने निराश झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.


हेही वाचा – Bihar Election: गुप्तेश्वर पांडेंचा निवडणुकीच्या रिंगणातून पत्ता कट; घेतला मोठा निर्णय