घरमहाराष्ट्रमुंबईत बर्ड फ्लू दाखल, चेंबूर, गिरगावात कावळ्यांचा मृत्यू

मुंबईत बर्ड फ्लू दाखल, चेंबूर, गिरगावात कावळ्यांचा मृत्यू

Subscribe

बर्ड फ्लूमुळे माणसांना धोका नाही, पण काळजी घ्या

राज्यतील काही भागात बर्ड फ्ल्यू दाखल झाला आहे. आता मुंबईतही बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चेंबूर, टाटा कॉलनी परिसरात ९ कावळ्यांचा आणि गिरगाव येथील बाल उद्यानात १६ कावळ्यांचा मृत्यू झाल्याने मुंबईत खळबळ उडाली.

चेंबूर येथील मृत कावळ्यांची तपासणी पुणे येथील प्रयोगशाळेत करण्यात आली. यामध्ये दोन कावळ्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गिरगाव चौपाटी येथील बाल उद्यानात गेल्या तीन दिवसात १६ कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे माजी नगरसेवक दिलीप नाईक यांनी सांगितले.

- Advertisement -

हे उद्यान सध्या कोरोना वातावरणामुळे बंद अवस्थेत आहे. तसेच हे उद्यान मुलांसाठी सुरू करण्यात यावे, यासाठी त्यांनी उद्यानाची मुद्दाम पाहणी केली. त्यावेळी त्यांना या उद्यानात ४ कावळे मृत अवस्थेत आढळून आले. त्यापूर्वी याच उद्यानात १२ कावळे मृत पावले होते, अशी माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिल्याचे दिलीप नाईक यांनी सांगितले.

या कावळ्यांच्या मृत्यूबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे. वास्तविक, अगोदर सापडलेल्या मृत कावळ्यांपैकी काही कावळ्यांना कचऱ्यात टाकून देण्यात आले होते, असेही दिलीप नाईक यांनी सांगितले. चेंबूर व गिरगाव बाल उद्यानातील मृत कावळ्यांच्या मृतदेहाचे नमुने राज्याच्या पशु संवर्धन विभागाने गोळा केले असून हे सर्व नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठवण्यात आले असता दोन कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

बर्ड फ्लूमुळे माणसांना धोका नाही, पण काळजी घ्या

बर्ड फ्ल्यूमुळे माणसांना काहीही धोका नाही मात्र तरीही काळजी घेणे आवश्यक आहे. कच्चा मांसाहार करू नये. मटण, चिकन, अंडी चांगले शिजवून खाणे आवश्यक आहे, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -