घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रावरही बर्ड फ्लू चे संकट ? परभणीत ९०० कोंबड्यांच्या मृत्यूने खळबळ

महाराष्ट्रावरही बर्ड फ्लू चे संकट ? परभणीत ९०० कोंबड्यांच्या मृत्यूने खळबळ

Subscribe

महाराष्ट्राच्या नजीकचे राज्य असलेल्या गुजरात आणि कर्नाटकमध्ये बर्ड फ्लू येऊन ठेपल्याची माहिती ताजी असतानाच आता महाराष्ट्रातील एका जिल्ह्यातील आलेल्या एका माहितीमुळे राज्यावरही या संकटाची टांगती तलवार आहे. परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात एका पोल्ट्री फार्ममधील जवळपास ९०० कोंबड्यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ माजली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोंबड्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबतचा अहवाल लवकरच बर्ड फ्लूचा धोका आहे का ? याबाबतचा खुलासा करणे अपेक्षित आहे.

 

- Advertisement -

परभणीतील मुरूंबा गावात एकाचवेळी ९०० कोंबड्यांच्या मृत्यू झाल्याचे कळताच या गावातील कोंबड्यांच्या खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या कोंबड्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने अहवाल मागवला आहे. दोन दिवसांपासून होणारा कोंबड्यांच्या मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याबाबतची माहिती लवकरच स्पष्ट होईल असे अपेक्षित आहे. पण या घटनेमुळे पोल्ट्री व्यवसायावर एक मोठे संकट उभे राहिले आहे. बर्ड फ्लू चे संकट पाहता येत्या दिवसात महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायालाही मोठा फटका बसणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.

 

- Advertisement -

मृत कोंबड्यांच्या सॅम्पल्सवर पुण्यातील प्रयोगशाळेतून अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच महाराष्ट्रात बर्ड फ्लू आहे की नाही याबाबतची स्पष्टता येणार आहे. परभणी जिल्ह्यातील या घटनेमुळे मात्र अनेक कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. अहवाल आल्यानंतरच कोंबड्यांचा मृत्यू काय कारणामुळे झाला आहे याबाबतची स्पष्टता येईल अशी माहिती जिल्हा पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारमार्फत अद्यापतरी राज्यात बर्ड फ्लूचे संकट आल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. देशातही कोणत्याही व्यक्तीला बर्ड फ्लू झाल्याचा दावा केंद्राने केलेला नाही. पण सतर्कतेचा उपाय म्हणून अनेक राज्यात सरकार कामाला लागले आहे. आतापर्यंत राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यात बर्ड फ्लू चे संकट आल्याचे जाहीर कऱण्यात आले आहे. विविध राज्यांमध्ये बर्ड फ्लू मुळे बदक, कावळे, कोंबड्या, स्थलांतरीत पक्षी अशा पक्षांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या नजीकच्या राज्यात कर्नाटक आणि गुजरातमध्येही बर्डू फ्लू येऊन ठेपला आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -