घरमहाराष्ट्रनाशिकमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, बाधित क्षेत्रातील कोंबड्यांसह अंडी नष्ट करण्याचे आदेश

नाशिकमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, बाधित क्षेत्रातील कोंबड्यांसह अंडी नष्ट करण्याचे आदेश

Subscribe

जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील वाठोडा भागात घरगुती पाळीव कोंबड्यांमध्ये आढळला बर्ड फ्लूचा संसर्ग

महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये शिरकाव केलेला बर्ड फ्लूने नाशिक जिल्ह्यातही आढळून आल्याने पोल्ट्रीधारकांसह मांसाहार करणाऱ्यांमध्येही चांगलीच धडकी भरली आहे. जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील वाठोडा भागात घरगुती पाळीव कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आल्याने या परिसरातील १ किलोमीटर क्षेत्र बाधित आणि १० किलोमीटर क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान, बाधित कोंबड्यांसह अंडी व त्यांचे खाद्य तातडीने नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शिघ्र कृती दलास दिले आहेत.

३ महिने प्रतिबंध

बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षांसह त्यांची अंडी व खाद्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे आदेश दिल्यानंतर संबंधित परिसर व शेड्सचे निर्जंतुकीकरण करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.  तसेच, १० किलोमीटर परिघातील कुक्कुट पक्षांची विक्री, वाहतूक, प्रदर्शनाला पुढील ९० दिवसांपर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे. या क्षेत्रात येणाऱ्या गावांमधूनही पक्षांची ने-आण करण्यावर बंदी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -