घरताज्या घडामोडीभाजप आणि मनसे एकत्र येऊ शकत नाही - एकनाथ खडसे

भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकत नाही – एकनाथ खडसे

Subscribe

सध्या भाजप आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. याचं पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुंबईतील भाजप कार्यालय गाठलं आहे. यावेळेस एकनाथ खडसे म्हणाले की, ‘भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकत नाही. भाजप हा व्यापक विचारधारा असलेला पक्ष आहे. तसंच प्रांतवाद मांडणार पक्ष आमच्यासोबत येऊ शकत नाही’, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

नक्की काय म्हणाले खडसे?

‘मला वाटतं नाही भाजप आणि मनसे या क्षणाला एकत्र येऊ शकतील. भारतीय जनता पार्टीत आणि मनसेत जरी हिंदुत्वाचा धागा एकत्र असल्याचं दिसतं असलं तरी भारतीय जनता पार्टी देशभरात व्यापक विचारधारा असलेला पक्ष आहे. भाजप हे सर्व धर्म, सर्व जाती, सर्व राज्य एकत्र असलेला पक्ष आहे. कुठल्या प्रदेश किंवा राज्यापुरती मर्यादित भाजपाची विचारधारा नाही. स्थानिकांना रोजगार मिळावा किंवा स्थानिकांना न्याय मिळावा याकरिता शिवसेना आणि मनसेची स्थापना झाली होती. आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे. आमच्याकडे हटाव लुंगी बचाव पुंगी अशाप्रकारची आंदोलन झालेली नाही आहेत. तसंच अशाप्रकारचा प्रांतवाद भारतीय जनता पार्टी करत नाही’, अशी खडसे यांनी भूमिका मांडली.

- Advertisement -

याशिवाय त्यांनी शिवसेना आणि भाजपाची युती का झाली याबाबत देखील स्पष्ट केलं. ते म्हणाले की, ‘शिवसेना पक्षाने व्यापक धोरण स्विकारल्यामुळे आणि भाजपाचे अनुकरण केल्यामुळे शिवसेना आणि भाजपाची युती झाली होती. आता भाजपाला युती करण्याची आवश्यकता नाही आहे.’

आज मनसे विरुद्ध शिवसेना सामना

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती गुरुवारी साजरी केली जात असतानाच मुंबईत मात्र राजकीय धुरळा उडणार आहे. मुंबईत गुरुवारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मनसेने आपल्या झेंडा बदलण्याचा निर्णय घेतला असून या अधिवेशनात अनेक राजकीय ठराव केले जाणार आहेत. उभ्या महाराष्ट्राचे लक्ष मनसेच्या नव्या भूमिकेवर लागून राहिले आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना दिलेला शब्द खरा करुन दाखविल्याने शिवसेनेने जल्लोष मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबईत मनसे विरोधात शिवसेना असा सामना रंगणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -