मेधा कुलकर्णींचा पत्ता कट, भाजपकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून मेधा कुलकर्णींना डावलले

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आगामी निवडणुकांसाठी भाजपने यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील कोथरुड मतदारसंघा माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सोडला होता. त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे भाजपतर्फे सांगण्यात आले होते. मात्र पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आले आहे. या मतदारसंघासाठी संग्राम देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. पुण्यातील जागेसाठी भाजपकडून महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे यांच्या नावाची चर्चा होती. पण अखेर सांगलीच्या संग्राम देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

भाजपचे उमेदवार

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – शिरीष बोराळकर

पुणे पदवीधर – संग्राम देशमुख

नागपूर पदवीधर – संदीप जोशी

अमरावती शिक्षक मतदारसंघ – नितीन धांडे