घरमहाराष्ट्रकल्याणमधील महत्वाच्या दोन्ही मैदानांचे भाजपाकडून बुकिंग

कल्याणमधील महत्वाच्या दोन्ही मैदानांचे भाजपाकडून बुकिंग

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. कल्याणातील वासुदेव बळवंत फडके आणि यशवंतराव चव्हाण क्रिडासंकूल ही दोन महत्वाची मैदाने आहेत. निवडणुकीच्या काळात जाहिर सभेसाठी ही दोन मैदाने मिळविण्यासाठी  राजकीय पक्षामध्ये भलतीच चढाओढ असते. यंदा मात्र शेवटच्या आठवडयासाठी ही दोन्ही मैदाने भाजपने बुकिंग केली आहेत.

कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानावर २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. त्याच प्रमाणे यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची सुध्दा सभा झाली होती. त्यामुळे निवडणुकीच्यावेळी कल्याणातील  या दोन मैदानाना सभेसाठी मोठी मागणी असते. मात्र ही दोन्ही मैदाने अखेरच्या आठवड्यासाठी भाजपाने बूक केली आहेत. कल्याण पश्चिमचा परिसर हा भिवंडी लोकसभा मतदार संघात येतो. त्यामुळे  शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अजून निश्चित झालेलं नाही. २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराला अवघे  दहा ते बारा दिवस आहे त्यामुळे शेवटच्या टप्प्यात  प्रचाराला अधिक  रंग चढणार आहे.

- Advertisement -

आपल्या मतदार संघात पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या सभा व्हाव्यात अशी उमेद्वारासह कार्यकर्त्याची अपेक्षा असते. भाजपच्या वाट्याला आलेला भिवंडी मतदार संघ हा मुख्यमंत्रयासाठी  महत्वाचा असून या मतदार संघातून विजयी होण्यासाठी भाजपाकडून शर्थीचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे.महापालिका क्षेत्रात एकूण १५ मैदाने आहेत.  कल्याणातील यशवंतराव चव्हाण क्रिडांगण आणि वासुदेव बळवंत फडके मैदान हे दोन्ही मैदान महत्वाची आहेत.  मैदानाचे बुकिंग करताना पालिकेने आचारसंहिता पाळण्याचे आणि ध्वनीप्रदूषण होणार नाही यासंदर्भात सुचना केल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान आणि कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड मैदान जाहिरसभांसाठी उपलब्ध आहेत. मात्र  कल्याणातील सुभाष मैदान आणि डोंबिवलीतील हभप वासुदेव महाराज म्हात्रे क्रिडासंकूल आणि नेहरू मैदान या तीन मैदानांवर प्रचारसभा घेण्यास पालिकेकडून परवानगी देण्यात येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -