घरट्रेंडिंगअसंतुलित मांसाहारामुळे चीनमध्ये कोरोनाचे संकट - भाजप नगरसेवक

असंतुलित मांसाहारामुळे चीनमध्ये कोरोनाचे संकट – भाजप नगरसेवक

Subscribe

राज्यातही ४ मुख्य शहरात हॉस्पिटल बांधण्याची भाजप नगरसेवकाची मागणी

चीनी लोकांच्या असंतुलित मांसाहारामुळे व्हायरस चीनमध्ये पसरत गेला आहे. त्याचा परिणाम संपुर्ण जगातील आर्थिक घटकांवर बसत आहे असे विधान भाजपचे माजी आमदार आणि नगरसेवक अतुल शहा यांनी केले आहे. संपुर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसने चीनमधील व्हुहान शहरात थैमान घातले आहे. संपूर्ण शहराला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसने चीनमधील व्हुहान शहरात थैमान घातले आहे. संपुर्ण जगात या व्हायरसमुळे भीतिचे वातावरण आहे. व्हायरसमुळे संपूर्ण जगाच्या आर्थिक घटकांवर परिणाम घडत असल्याचे दिसून आल आहे.

 

- Advertisement -
भाजपचे नगर सेवक अतुल शहा यांनी कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी राज्यात चार शहरात हॉस्पिटल बांधण्याची मागणी केली आहे
भाजपचे नगर सेवक अतुल शहा यांनी कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी राज्यात चार शहरात हॉस्पिटल बांधण्याची मागणी केली आहे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने देखील या व्हायरसला जागतिक संकट म्हणून घोषित केले आहे. तसेच चीन सरकारने १५ दिवसात तेथे कोरेना व्हायरसवर उपचार करण्यासाठी रूग्णालय बांधल आहे. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊ महाराष्ट्रातील ४ प्रमुख शहरात एखा विशिष्ठ ठिकाणी कोरोना सारख्या जीवघेण्या व्हायरसवर आपत्काली काळात उपचार करण्यासाठी रूग्णालये बांधावीत. त्यामुळे भविष्यात कधी अशी वेळ आपल्या शहरांवर आली तर त्वरीत उपचार करता येतील असाही मानस त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -