घरताज्या घडामोडीSardar Tara Singh: पाचव्यांदा आमदार व्हायचे होते, पण

Sardar Tara Singh: पाचव्यांदा आमदार व्हायचे होते, पण

Subscribe

मुंबईच्या वेशीवर असलेल्या मुलुंडच्या विकासासाठी सरदार तारासिंग हे तब्बल ४० वर्ष प्रयत्नशील होते. मुलुंड मधूनच ते सलग तीन वेळा तब्बल पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर गेली दोन दशके अर्थात तब्बल वीस वर्ष भाजपाकडून ते महाराष्ट्र विधानसभेवर सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. म्हणून ‘तारासिंग म्हटले की मुलुंड’ असे एक समीकरणच झाले होते. इतके सरदार तारासिंग हे मुलुंड परिसरातील समस्यांशी तसेच तेथील समाजजीवनाशी एकरूप झाले होते.

ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांचे वय आणि मुलगा रणजीत सिंग याला पीएमसी बँक प्रकरणात झालेली अटक यामुळे भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. सरदार तारासिंग यांचे वय त्यावेळी ८२ वर्षांचे होते. ७५ वर्षा पुढील व्यक्तीला उमेदवारी द्यायची नाही, असा नियम आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाढत्या वयाचा दाखला देत उमेदवारी देण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. मात्र किमान स्वतःला नाहीतर किमान मुलगा रणजीत सिंग त्याला उमेदवारी देण्यासाठी तारासिंग आग्रही होते. मात्र निवडणुकीपूर्वीच मुलगा रणजीत सिंग याला पीएमसी बँक प्रकरणी अटक झाली. त्यामुळे रणजीत सिंग याचा आमदारकीवरचा दावाही भाजपातील अंतर्गत हितशत्रूंनी हाणून पाडला.

- Advertisement -

त्यापूर्वी २०१७ साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तारासिंग हे रणजीत सिंग याला नगरसेवक पदाच्या उमेदवारी करता आग्रही होते. मात्र त्यावेळी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांचा मुलगा नील सोमय्या त्याच्याकरीता आग्रह धरला आणि या लढाईमध्ये अखेरीस किरीट सोमय्या यांच्या शब्दाला मान देत रणजीत सिंग ऐवजी निल सोमय्या यांना भाजपने उमेदवारी दिली. निल सोमय्या हे मुंबई महापालिकेवर निवडून देखील आले. खरेतर तेव्हापासूनच भाजपात किरीट सोमय्या आणि सरदार तारासिंग यांच्यात छुपे राजकीय युद्ध सुरू झाले होते. वास्तविक १९९९ साली सरदार तारासिंह हे मुलुंड मधून प्रथम आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले होते. त्यापूर्वी या मतदारसंघातून किरीट सोमय्या आमदार म्हणून निवडून येत असत.

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -