मुख्यमंत्रीसाहेब बिचुकलेंना ‘बिग बॉस’मधून बाहेर काढा

बिग बॉस मराठी २ च्या घरातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेंना शो बाहेर काढण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

Mumbai
Bjp fromer bmc corporator demanding action against bigg boss marathi 2 abhijeet bichukale
बिग बॉस मराठी २ – बिचुकलेंना शो बाहेर काढा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासून या घरात भांडण असो वा घरामध्ये झालेले टास्क असो सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकण्यास सुरुवात केली आहे. या सिझन २ च्या स्पर्धकाविरोधात भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

नेमके काय घडले?

बिग बॉस मराठी २ च्या घरातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेंना शो बाहेर काढण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रसारीत झालेल्या कार्यक्रमामध्ये अभिजीत बिचुकले आणि रुपाली भोसले या स्पर्धकांमध्ये जोरदार वादावादी झाली. रुपाली भोसले यांनी बिचुकलेंवर आरोप करताना त्यांना मुलीची शपथ घेण्याचे आव्हान दिले. आरोप आणि मुलीची शपथ घेण्यासाठी सांगितल्यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी रुपालीला अपशब्द वापरले.

बिचुकलेंचे वक्तव्य हे घटस्फोटित महिला, परित्यक्ता आणि सिंगल मदर महिलांचा अपमान करणारे असल्याचे वक्तव्य भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी केले आहे. अभिजीत बिचकुलेंवर कारवाई करावी या मागणीसाठी रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून या संबंधित वाहिनी आणि अभिजीत बिचुकलेंवर कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा रितू तावडे यांनी दिला आहे.


हेही वाचा – ‘केतकीला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई होणार’

हेही वाचा – ‘आर आर आर’ सिनेमाची प्रदर्शनापुर्वीच कोटींची कमाई!