घरमहाराष्ट्रत्यांच्याकडे एक तर आमच्याकडे १० 'राज ठाकरे' - विनोद तावडे

त्यांच्याकडे एक तर आमच्याकडे १० ‘राज ठाकरे’ – विनोद तावडे

Subscribe

राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओं'ना भाजप कसं उत्तर देणार?

‘लाव रे तो व्हिडिओ’…या एका वाक्याने राज्यासह देशात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुगल असो की फेसबुक सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडिओ या एकाच वाक्याची चर्चा आहे. सत्ताधारी भाजपाला तर राज ठाकरेंच्या या एका वाक्याने तर अक्षरशः धडकी भरली आहे. त्यामुळे राज ठाकरेंकडून भर सभेत भाजपावर व्हिडिओ दाखवून केलेले आरोप खोडून काढण्यासाठी भाजपाची संपूर्ण सोशल मीडिया टीमचं कामाला लागली आहे. मात्र भाजपचे धुमाकूळ घालणारे व्हिडिओ केव्हा पाहायला मिळणार, असा सवाल केल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले ‘आमचे देखील व्हिडिओ येणार. त्यांच्याकडे एक ‘राज ठाकरे’ आहे. आमच्याकडे दहा राज ठाकरे आहेत. त्यामुळे आम्ही देखील मनसेचे व्हिडिओ दाखवणार आहे’. माय महानगरचा ‘खुल्लम खुल्ला’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

#Live : राज ठाकरेंच्या व्हिडिओंना भाजप कसं उत्तर देणार? ऐका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे 'खुल्लमखुल्ला' उत्तर…

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 22, 2019

- Advertisement -

भाजपची सोशल मीडिया टीम लागली कामाला

भाजपाच्या सोशल मीडिया टीमला तर थेट आदेशच देण्यात आले आहेत की, इतर नेत्यांच्या सभांपेक्षा फक्त आणि फक्त राज यांच्या सभेवर लक्ष देऊन त्याला उत्तर कसे देता येईल याचे नियोजन करा. त्यामुळेच सध्या भाजपाची सोशल मीडिया टीम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कुठे आहे याची माहिती घेऊन, त्यानंतर ही टीम कामाला लागली आहे. तसेच राज ठाकरेंचे किंवा राज ठाकरे यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका केलेल्या जुन्या क्लिप्स शोधून राज ठाकरेंच्या भाषणाची तोडफोड करून या क्लिप त्यामध्ये जोडल्या जातात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र’ या भाजपाच्या फेसबुक पेजवरून राज ठाकरेंवर टीका करण्यात येत आहे. कधी राज ठाकरेंचे व्यंगचित्र बनवून त्यातून त्यांच्यावर टीका करण्यात येते तर त्यांच्यावर टीका करणारे व्हिडिओ भाजपाच्या सोशल टीमकडून बनवले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -