घरमहाराष्ट्र'बटन दाबलं काँग्रेसचं प्रकाश पडला कमळावर'

‘बटन दाबलं काँग्रेसचं प्रकाश पडला कमळावर’

Subscribe

राज्यात आज १० मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. या पैकी अनेक मतदारसंघामध्ये ईव्हीएममशीमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सोलापूरात वंचित आघाडीच्या चिन्हासमोर बटण दाबलं की कमळालाच मतदान होत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी केला. त्याचपाठोपाठ आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील भाजपवर आरोप केला आहे.

काँग्रेसला मतदान केल्यानंतर भाजपला मत जात असल्याचा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. त्यांनी आज सकाळी सोलापूरात मतदान केले. त्यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदे आणि मुलगी प्रणिती शिंदे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. सोलापूर येथील जागृती विद्या मंदिरात त्यांनी मतदान केले. त्यानंतर सोलापूरातील अनेक मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीन बिघाडच्या घटना समोर आल्या. अशामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांची मोठी रांग लागली आणि गोंधळ झाला. मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान करण्याची वेळ वाढवण्यात यावी अशी मागणी सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी देखील हाच आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चिन्ह कपबशीसमोरील बटण दाबल्यास कमळाला मत जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर आणि सुजात याने केले होता. याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी मशीन सील केल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर आणि सुजात आंबेडकर यांनी आज मतदान केले. मतदान करुन आल्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -