घरताज्या घडामोडी'कर्तृत्वाने मोठे व्हा', पंकजा मुंडेंच्या बंडाविरोधात भाजपचे नेते मैदानात

‘कर्तृत्वाने मोठे व्हा’, पंकजा मुंडेंच्या बंडाविरोधात भाजपचे नेते मैदानात

Subscribe

पक्षात राहून पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर भाजप नेतृत्वाच्या समर्थनार्थ काही नेते उतरले आहेत.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत राज्यातील भाजपच्या नेतृत्वावर तोफ डागली होती. तसेच शेटजी-भटजींच्या पक्षाला माझ्या वडिलांनी बहुजनांचा पक्ष बनवला. आता भाजपला पुन्हा रिव्हर्स गेअरमध्ये टाकू नका, असा टोमणा अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांना लगावला होता. पंकजा मुंडेंच्या या टिकेला उत्तर देण्यासाठी भाजपचे दुसरे ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे मैदानात उतरले आहेत. “ओबीसी समाजन भाजपवर नाराज नाही. पक्षाने नेत्यांच्या योग्यतेनुसार त्यांना पदे दिलेली आहेत. नेते हे जातीने नाही तर कर्तुत्वाने मोठे होतात, असे टोमणा बावणकुळे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे.

बावनकुळे हे विदर्भातील ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात. एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्याप्रमाणे त्यांचेही तिकीट विधानसभा निवडणुकीत कापण्यात आले होते. मात्र तरिही त्यांनी कोणतेही बंडाचे निशाण फडकवले नाही. उलट मुंडे, खडसे पक्षाच्या विरोधात नाराजी प्रकट करत असताना बावनकुळे यांनी पक्षाची बाजू उचलून धरली आहे. बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला आणि भाजपला पुढे नेण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. नेता हा संपुर्ण समाजाचे नेतृत्व करत असतो. जातीने कोणताही नेता मोठा होत नसतो, तर कर्तुत्वाने मोठा होतो. सध्या भाजपचे सरकार नसल्यामुळे जाती-पातीचे राजकारण केले जात आहे, असा आरोप देखील बावनकुळे यांनी केला.

- Advertisement -

ओबीसी नाही तर पंकजा पक्षापासून दूर – काकडे

तर दुसऱ्या बाजुला भाजपचे राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी देखील पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. जी व्यक्ती ३० हजारांच्या मतांनी पराभूत होते, त्या व्यक्तीला पक्षावर टीका करण्याचा अधिकार नाही. ज्याला स्वतःचे घर सांभाळता येत नाही किंवा ज्याला पराभव पचवता येत नाही, त्याने दुसऱ्यावर आरोप करु नये, अशी टीका संजय काकडे यांनी केली आहे. पंकजा मुंडे यांच्या आरोपांमुळे ओबीसी समाज भाजपपासून दुरावेल, अशी शक्यता काकडे यांनी फेटाळून लावली. संजय काकडे पुढे म्हणाले की, पंकजा मुंडे यांना पाच वर्षांनंतर दलित, मराठा, ओबीसी आणि मुस्लिम कसे दिसले? पंकजा मुंडेंनी मुस्लिम, दलितांना दूर केल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे तिथल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत. पाच वर्षात पाशा पटेल पंकजा मुंडेंच्या मंचावर का दिसले नाहीत? असा देखील प्रश्न काकडे यांनी उपस्थित केला.

त्यासोबतच पंकजा मुंडेंना आताच मराठवाड्याचे प्रश्न कसे काय दिसले? सत्तेत असताना पाच वर्षात दुष्काळासाठी त्यांनी काय काम केले? असा आरोपही काकडे यांनी केला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त काही निवडक लोकांना हाताशी धरुन ड्रामा करण्याचा प्रयत्न केला गेला, अशीही टीका काकडे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय काकडे यांनी एबीपी माझा या वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरोधात ही टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -