घरताज्या घडामोडीकेंद्राकडे बोट दाखवणं बंद करा आणि शेतकऱ्यांना मदत करा; फडणवीसांचा हल्लाबोल

केंद्राकडे बोट दाखवणं बंद करा आणि शेतकऱ्यांना मदत करा; फडणवीसांचा हल्लाबोल

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाणी करत असून बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री चूकीची माहिती सांगत असल्याचं फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडे वस्तूस्थिती पोहोचली नाही. आम्ही गेलेल्या ठिकाणी पंचनामे झाले नसल्याची तक्रार आहे. ८० ते ९० टक्के पंचनामे झाले हे सांगणे योग्य नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकार आपले हात झटकून केंद्राला बोट दाखवणं बंद करा आणि शेतकऱ्यांना भरघोस मदत करा, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं.

तीन दिवसांमध्ये ९ जिल्ह्यांमध्ये प्रवास केला. एकूण परिस्थिती अत्यंत भीषण आहे. कापूस, सोयाबीन, ऊस, कांदा यासह जवळजवळ सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. जमीन खरवडून गेली आहे. माती वाहून आणून शेतकऱ्यांना जमीन तयार करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले. ३ दिवसात ९ जिल्ह्यात ८५० किमी प्रवास केला. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी आहे. पुढच्या पिकाकरिता जमीन तयार करायची हे मोठे आव्हान आहे. महाबीजचं बियाणं बोगस निघालं. तिबार पेरणी केल्यांनंतरही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती काही मिळणार नाही, कृषीपंप वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश आहे, असंही फडणवीसांनी म्हटलं.

- Advertisement -

जीएसटीचा सगळा पैसा केंद्र कर्ज काढून देत आहे. आपल्याकडे ६० कोटींची फिस्कल लिमीट शिल्लक आहे. जीएसटीचा बहाणा चुकीचा आहे. राज्य सरकारला मेमोरेंडम तयार करावं लागतं ते चेक होतं, त्यानंतर एक केंद्रीय समिती दावा मंजूर करते, अशी माहिती फडणवीसांनी दिली. राज्य सरकारने आपले हात झटकून केंद्राला बोट दाखवणे चुकीचे आहे. महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा कांगावा केला जात आहे. तो चुकीचा आहे. यूपीए सरकारच्या काळात मदत मागितली मात्र त्या प्रमाणात कधीच मिळाली नाही. यूपीएच्या कालावधीत २६ हजार ८०५ कोटी मागितले पण केंद्राने ३ हजार ७०० कोटी दिले होते. पण, मोदी सरकारच्या काळात २५ हजार कोटी मागितले आणि ११ हजार कोटी मिळाली ही रक्कम युपीए पेक्षा तिप्पट होती, असं फडणवीसांनी म्हटलं. केंद्र सरकार एनडीआरएफकडून एसडीआरएफला पूर्वीचं पैसे देत असतं त्यामुळे तो दावाही चुकीचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -