घरमहाराष्ट्रतर सगळ्यांसमोर पुरावे जाहीर करीन; एकनाथ खडसेंचा पुन्हा इशारा!

तर सगळ्यांसमोर पुरावे जाहीर करीन; एकनाथ खडसेंचा पुन्हा इशारा!

Subscribe

एकनाथ खडसेंनी पक्षांतर्गत विरोधकांविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला असून जळगावमध्ये होत असलेल्या बैठकीच्या आधीच त्यांनी माध्यमांशी बोलताना पक्षांतर्गत विरोधकांवर तोफ डागली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर आणि विशेषत: राज्यातील नेतृत्वावर नाराज असल्याचं समोर आलं होतं. एकनाथ खडसे यांनी देखील अनेकदा ते बोलून दाखवलं आहे. मात्र, आता खडसेंनी पुन्हा एकदा आपली तलवार परजली असून पक्षातल्या विरोधकांना आव्हान दिलं आहे. ‘मला जर पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितलं, तर ज्यांनी ज्यांनी पक्षात पाडापाडीचं काम केलं आहे, त्यांची नावं पुराव्यांनिशी जाहीर करीन’, असा इशारा खडसेंनी दिला आहे. जळगावमध्ये सध्या भाजपची ६ जिल्यांतील कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित आहेत. या बैठकीसाठी पोहोचलेल्या एकनाथ खडसेंनी बैठकीत जाण्याआधीच माध्यमांसमोर बोलताना वादाची राळ उडवून दिली आहे. दरम्यान, या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना खडसेंची कोणतीही नाराजी नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ खडसेंची कोणतीही नाराजी नसून त्यांचं म्हणणं बैठकीमध्ये ऐकून घेण्यात आलं आहे. त्यानुसार जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा – माझं आणि पंकजाचं एकमत-एकनाथ खडसे

गिरीश महाजनांच्या आव्हानाला दिलं उत्तर!

शनिवारी जळगावमध्ये भाजपच्या ६ जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीत एकनाथ खडसेच गैरहजर असल्यामुळे त्यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले होते. पण दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक खडसे बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांनी सांगितलं, ‘मला सकाळच्या बैठकीविषयी काहीही माहिती नाही. मला बैठकीची वेळ साडेतीनची सांगितली होती. त्यानुसार मी बैठकीला वेळेवर पोहोचलो आहे’. यावेळी खडसेंनी गिरीश महाजन यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिलं. ‘निवडणुकांमध्ये असं कुणी कुणाला पाडत नसतं. खडसेंना अपयश आल्याचं वाईट वाटतंय. पण याआधीदेखील असं अपयश आलेलं आहे. रोहिणी खडसेंना कुणी पाडलं असं त्यांना वाटत असेल, तर त्यांची नावं गुप्त न ठेवता पुराव्यांनिशी जाहीर करावीत’, असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं होतं.

- Advertisement -

खडसेंची नाराजी तूर्तास ‘स्थगित’?

गिरीश महाजन यांच्या आव्हानाविषयी विचारलं असता खडसे म्हणाले, ‘माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. दर अध्यक्षांनी सांगितलं, तर मी ते पुरावे नावानिशी जाहीर करायला देखील तयार आहे. त्यांनी सांगितलं, तर बैठकीनंतर लगेच पत्रकार परिषद घेऊन ते पुरावे मी जाहीर करू शकतो’. मात्र, बैठकीनंतर एकनाथ खडसेंनी कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे तूर्तास तरी खडसेंची नाराजी थोपवून धरण्यात भाजपला यश आल्याचं बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -