Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर महाराष्ट्र नाशिक ‘महाराष्ट्रात लवकरच रामराज्य येईल; थोडी वाट पाहा’

‘महाराष्ट्रात लवकरच रामराज्य येईल; थोडी वाट पाहा’

अयोध्येत खटल्याच्या निकालावर समाधान व्यक्त करत लवकरच महाराष्ट्रातही रामराज्य येईल, असा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केला

Nashik
Girish Mahajan
मंत्री गिरीश महाजन

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येच्या निकालावर समाधान आणि आणि आनंद व्यक्त करत भाजपाचे कार्यकर्ते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. काळारामाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अयोध्येच्या निकालावर आनंद व्यक्त करत पत्रकारांशी देखील संवाद साधला.

‘महाराष्ट्रात देखील लवकरच रामराज्य येणार असून थोडी वाट पाहा’. यावेळी त्यांनी युती आणि त्यासंदर्भातील बोलणे टाळले. तसेच, ‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वासाठीच चांगला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालात संतुलन राखलं आहे. यानंतर शांतता आणि संयम बाळगणे गरजेचे आहे.’, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले.

दोन्ही समाजाला मान्य होईल असाच हा निर्णय – गिरीश महाजन

दोन्ही समाजाला मान्य होईल असाच हा निर्णय – गिरीश महाजन

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ನವೆಂಬರ್ 9, 2019

 

राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर ऐतिहासिक निर्णयानंतर अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. या निकालानंतर अनेक राजकीय मंडळी, हिंदुत्ववादी संघटनानी देखील या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला.


Ayodhya Verdict : जागा रामलल्लाचीच, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे मुद्दे!