काँग्रेस महिला कार्यकर्त्याला मिळाली सामूहिक बलात्काराची धमकी

गोवा प्रदेश महिला काँग्रेस सचिव दीया शेटकर यांना सामूहिक बलात्काराची धमकी देण्याची घटना घडली आहे. भाजप नेते सुभाष शिरोडकर यांच्या समर्थकांनी ही धमकी दिल्याचा आरोप शेटकर यांनी केला आहे.

Punjim
Diya Shetkar
गोवा प्रदेश महिला काँग्रेस सचिव दीया शेटकर

गोवा प्रदेश महिला काँग्रेस सचिव दीया शेटकर यांना सामूहिक बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते सुभाष शिरोडकर यांच्या आदेशावरुन बलात्काराची धमकी दिली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी पणजी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. अज्ञात गुडांनी फोनवरुन ही धमकी दिली असल्याचे शेटकर यांनी सांगितले आहे. या घटनेचा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निशेध करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान या प्रकरणी शिरोडकर यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

या प्रकरणी सांगताना दीया शेटकर म्हणाल्या की, “शिरोडकर यांचे समर्थक खालच्या पातळीवर उतरले आहेत. मला फोन करून सामूहिक बलात्काराची धमकी दिली. या प्रकरणी पणजी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.”

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here