माझ्या जीवाला धोका; अनिल गोटेंचा गौप्यस्फोट

अवधान येथील प्रचार सभेत अनिल गोटे यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयन्त केला गेल्याची माहिती, त्यांनी स्वत: आपलं महानगरला दिली.

Mumbai
anil gote
अनिल गोटे

भाजप आमदार अनिल गोटे यांनी माझ्या जीवाला धोका असल्याच गौप्यस्फोट राज्याच्या विधानसभेत केला आहे. भाजपच्या नगरसेविका प्रतिभाताई चौधरी यांचा ज्येष्ठ मुलगा दाऊ चौधरी यांनी आमदार अनिल गोटे यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती समेर आली आहे. अवधान येथील प्रचार सभेत अनिल गोटे यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयन्त केला गेला. मात्र, हा प्रकार एका डॉक्टरच्या वेळीच लक्षात आल्यामुळे अनर्थ टळला आणि माझे प्राण वाचले, अशी माहिती स्वत: अनिल गोटे यांनी आपलं महानगरला दिली. दरम्यान, भाजप आमदार अनिल गोटे यांच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाली असून, ही क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भाजपा नगरसेविका प्रतिभा चौधरींचा मुलगा अमोल ऊर्फ दाऊ चौधरी यांच्या नावाचा उल्लेख आल्यानंतर, त्यांच्या वतीने गणेश नावाची एक व्यक्ती ज्याने ही ध्वनिफीत रेकॉर्ड केली त्या व्यक्तीला, अमोल उर्फ दाऊ चौधरीचे नाव घेऊ नये यासाठी दबाव आणला जात असल्याचे या ध्वनिफितीमधून स्पष्टपणे समोर येत आहे.


वाचा: ‘अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत’

अमोल चौधरी यांनी केलेला खुलासा आणि त्यांनी केलेली बाचाबाची या ध्वनिफीतीमध्ये ऐकू येत आहे. आमदार अनिल गोटे यांच्या हत्याकांडाची अंमलबाजवणी करणारा गणेश ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करणाऱ्या गणेशला (दोघांचेही नाव गणेश आहे) धमकावून अमोल चौधरीचे नाव घेऊ नको, असे स्पष्टपणे सांगत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस मात्र मंत्र्यांच्या दबावाखाली फक्त संभाषण ऐकण्याचा आनंद घेत असल्याचा आरोप काहीजणांनी केला आहे. दरम्यान, सुग्रास भोजन म्हणून भाजपने आपल्याच ताटात गुन्हेगारीचे विष कालवून ठेवण्याचा हा सुस्पष्ट पुरावा असल्याचा आरोप, अनिल गोटे यांनी आपलं महानगरशी बोलताना केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here