Video: ‘खपवून घेतले जाणार नाही..’ त्या पुस्तकावर आ. शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया

Satara
shivendraraje bhosale bjp mla
भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले

“छत्रपती शिवाज महाराज यांची तुलना जगाच्या पाठीवर कोणाशी ही होऊ शकत नाही. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.”, अशा इशारा भाजपचे आमदार आणि सातारा गादीचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे. आपल्या फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करुन शिवेंद्रराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच शिवेंद्रराजेंनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमचा आम्ही सन्मान करतो. मात्र याचा अर्थ तुम्ही काहीही बोलू शकता असा होत नाही. बोलताना जरा भान ठेवा”, अशी टीका शिवेंद्रराजे यांनी केली आहे.

#छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना जगाच्या पाठीवर कोणाशी ही होऊ शकत नाही.असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.#श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले.#आमदार:-सातारा-जावली.#satara #satarabjp #bjpmaharashtra#Bjp4Maharashtra #Bjp4Satara #Satara#Chatrapati #छत्रपती#Shivendraraje4Satara#ShivendraRajeFC #SHivendraRajeforSatara #वारसा_छत्रपतींचा_वसा_जनसेवेचा

Chh. Shivendra Raje Bhonsle ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಜನವರಿ 12, 2020

 

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणारे “आज के शिवाजी, नरेंद्र मोदी” हे पुस्तक भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिले असून दिल्लीतील भाजप कार्यालयात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचे नेते भाजपवर टीका करत असतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजावरच टीका केली. त्यामुळे आता छत्रपतींच्या वंशजाकडूनही पलटवार करण्यात येत आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यसह अनेक थोर पुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे, त्यांची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. पक्षामधील काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून अशा चूका होत असतात. ज्यामुळे विरोधकांना पक्ष नेतृत्वावर टीका करण्याची संधी मिळते. भाजप नेतृत्वाला माझी विनंती आहे की, त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्याला योग्य ती समज देऊन पुस्तकाचे प्रकाशन झाले असेल तर ते थांबवावे आणि पुढे वितरीत करु नये.”


हे वाचा – माझ्यावर रागवण्यापेक्षा वशंजांनी भाजपचा राजीनामा द्यावा – संजय राऊत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here