घरमहाराष्ट्रही लोकं केवळ वयानं मोठी; उदयनराजेंचा नाव न घेता पवारांना टोला

ही लोकं केवळ वयानं मोठी; उदयनराजेंचा नाव न घेता पवारांना टोला

Subscribe

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नाव घेता टोला लगावला आहे. मराठा आरक्षणावर स्थगिती येण्यास सगळेच जबाबदार आहेत. कुणाचे नाव घेऊन मी कोणाला मोठे करणार नाही. हे लोक मोठे नाहीत, तर केवळ वयाने मोठे आहेत, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी पवारांना टोला लगावला.

मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी सातरा येथे पत्रकार परिषद घेत राज्यातील ज्येष्ठ नेत्यांवर, राज्य सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता पवारांना टोला लगावला. कुणाचे नाव घेऊन मी कोणाला मोठे करणार नाही. हे लोक मोठे नाहीत, तर केवळ वयाने मोठे आहेत. देवेंद्र फडणवीस मराठा नसून त्यांनी आरक्षण दिले. देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो, असे खासदार उदयनराजे म्हणाले. शरद पवारांशी चर्चा करुन काही उपयोग नाही. लोकांनी यांना मान सन्मान दिला, निवडून दिले. हेच लोक वेळ आली तर खाली खेचतात. लोक यांना रस्त्यावर येऊ देणार नाहीत. यांना घरात जाऊन जाब विचारतील, असे देखील उदयनराजे म्हणाले.

- Advertisement -

इतर समाजावर अन्याय झाला तरी त्यांचीही बाजू मांडत आलेलो आहे. इतर समाजाच्या लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. सर्वधर्म समभाव अशी भूमिका छत्रपतींची आहे. आता जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार खासदारांची नैतिकता आहे हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले. इतर कुठल्याही समाजावर अन्याय झाला तरी आम्ही त्यांचीही बाजू तितक्याच तीव्रतेने मांडू, असेही ते म्हणाले.


हेही वाचा – ज्येष्ठ नेत्यांनी जाणीवपूर्वक मराठा आरक्षण प्रलंबित ठेवलं; उदयनराजेंचं टीकास्त्र

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -