घरमहाराष्ट्रभाजप अध्यक्ष अमित शाह आज पुण्यात

भाजप अध्यक्ष अमित शाह आज पुण्यात

Subscribe

भाजप अध्यक्ष अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असून आज दुपारी १२ वाजता शाह कार्यकर्त्यांना संबोधीत करणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहे. आज दुपारी १२ वाजता शाह कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. यावेळी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर आठ प्रकल्पांच उदघाटन करणार आहेत. स्वारगेट येथील चौकातून प्रचाराला सुरुवात होणार आहे. पुणे येथील कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर शाह गोव्याला जाणार आहेत. अमित शाह यांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार आहे.

असा असेल शहा यांचा दौरा

भाजप अध्यक्ष अमित शाह आज दुपारी १२ वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा केंद्र येथे संम्मेलन घेणार आहेत. सायंकाळी साडे पाच वाजता अटल बूथ कार्यकर्ता संम्मेलनात कुजीरा – बम्बोलियम (गोवा) येथे कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत. मागील काही दिवसांपासून शाह यांनी पक्षाचा प्रचार सुरु केला आहे. काल उत्तर प्रदेश येथील जौनपूर मध्ये त्यांनी प्रचार केला होता.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -