घरमहाराष्ट्र'राहूल गांधींना अमेठीने स्वीकारले नाही, देश कसा स्वीकारणार?'

‘राहूल गांधींना अमेठीने स्वीकारले नाही, देश कसा स्वीकारणार?’

Subscribe

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सैय्यद शहानवाज हुसैन यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. 'राहूल गांधींना अमेठीने स्वीकारले नाही, देश कसा स्वीकारणार?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीमधील जनतेने खासदार म्हणून स्विकारले आहे. त्यामुळे हवेचा रोख ओळखून राहूल गांधी अमेठीतून पळ काढत वायनाडला गेले आहेत, असे विधान भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते सैय्यद शहानवाज हुसैन यांनी गुरूवारी मुंबईत केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, खासदार किरीट सोमय्या हे देखील यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि महिला मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते आणि भाजपा माध्यम विभाग प्रमुख केशव उपाध्ये, प्रवक्ते अतुल शाह उपस्थित होते.

हेही वाचा – राहुल गांधींच्या रोड शोदरम्यान तीन पत्रकार जखमी

- Advertisement -

‘राहुल गांधींवर नामुष्की ओढवली’

सैय्यद शहानवाज हुसैन म्हणाले की, ‘यंदाच्या लोकसभा निवडणूकीत सर्वात जास्त घाबरलेला कोणता पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. गेल्या ४ दशकापासून जो अमेठी मतदारसंघ काँग्रेसच्या कुटुंबाचा एक भागच बनून राहिलेला आहे. आज त्याच मतदारसंघातून राहूल गांधीना पळ काढण्याची नामुष्की आली आहे. आता अमेठीतील जनता त्यांच्याकडे हिशोब मागत आहे.’ ज्यांना अमेठीतल्या नागरिकांनी स्वीकारले नाही त्यांना देश कसा स्वीकारणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला. ‘राहूल गांधींनी वायनाड मतदारसंघ का निवडला हा संशोधनाचाच भाग आहे. जेथे अल्पसंख्यांचे प्रमाण जास्त आहे, अशा वायनाडमधुन ते आता लढणार आहेत. राहूल गांधी अमेठीतून पळाल्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या अन्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अन्य उमेदवारही निवडणूक लढावायची की नाही? याचा सध्या विचार करत आहेत’, असेही हुसैन म्हणाले.

हेही वाचा – राहुल गांधी यांचा वायनाडमधील उमेदवारी अर्ज दाखल

- Advertisement -

‘एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल’

एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रवक्ते हुसैन यांनी स्पष्ट केले की, ‘निवडणूकीमध्ये कोणत्या उमेदवाराला कोणत्या मतदारसंघातून उभे करायचे याचा सर्वस्वी निर्णय हा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून घेण्यात येतो. कोणत्याही पक्षाच्या दबावाखाली येऊन उमेदवार निवडीचे निर्णय घेतले जात नाहीत.’ लोकसभा निवडणूकीत मित्रपक्षाच्या साहय्याने एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि महिला मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी संकलित केलेल्या केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्या लेखाचा संग्रह असलेले ‘अजेंडा २०१९’ या पुस्तकाचे विमोचन राष्ट्रीय प्रवक्ते सैय्यद शहानवाज हुसैन यांच्या हस्ते करण्यात आले. विजया रहाटकर म्हणाल्या की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे केंद्रबिंदू हा महिलावर्ग आहे. महिलासाठी या सरकारने अनेक योजना केल्या आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपाच्या विजयामध्ये महिला वर्गाचा मोलाचा वाटा असेल.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -