हँकॉक पुलाच्या वाढीव कामाच्या खर्चाला भाजपचा विरोध

तब्बल २५ कोटींच्या वाढीव खर्चाचा हिशोब द्या, प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी शिवसेनेने फेटाळली

bmc
महापालिका

दक्षिण मुंबईतील बहुचर्चित रखडलेल्या हँकॉक पुलाच्या वाढीव बांधकामाचा खर्च वाढला कसा असा सवाल करत यासर्व खर्चाची माहिती मिळवण्यासाठी हा प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी भाजपने केली. मात्र, भाजपची ही मागणी बहुमताने उडवून लावत अध्यक्षांनी वाढीव बांधकामाच्या खर्चाचा प्रस्ताव संमत केला.

महापालिकेच्या बी विभागातील माझगावमधील शिवदास चापसी रोडवर असलेल्या हँकॉक पुुलाचे बांधकाम धोकादायक ठरल्याने रेल्वेच्यावतीने ते तोडण्यात आले. त्यानंतर या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. परंतु या पुलाच्या बांधकामासाठी नेमण्यात आलेला कंत्राटदार काळ्या यादीतील कंपनी असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ते कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर महापालिकेने नव्याने निविदा मागवून या पुलाच्या बांधकामासाठी २० फेब्रुवारी २०१८ रोजी १९ महिन्यात काम पूर्ण करण्यासाठी साई प्रोजेक्ट्स(मुंबई) प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली. या कंपनीला विविध करांसह ५१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले.

परंतु प्रत्यक्षात या कामाची प्रगतीचा आलेख वाढलेला नसतानाच याची कंत्राट किंमत २५ कोटी ७१ लाख रुपयांनी वाढलेला आहे. याबाबत भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी लोखंडी गर्डर्सचे वजन वाढवून ते ६६० ऐवजी १३७४ मेट्ीक टन एवढे करण्यात आले. ज्यामुळे २० कोटी ७६ लाखांनी खर्च वाढल्याचे म्हटले.मग हे आपल्या लक्षात कधी आले असा सवाल करत या वाढीव खर्चाची पूर्ण माहिती पटलावर समोर यायला हवी. सन २०१८मध्ये मूळ कंत्राट कामाचा प्रस्ताव मंजूर केला आणि २०२०मध्ये याच्या वाढीव कामाचा खर्च वाढतो.

त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपसूचना मतास टाकून बहुमताच्या जोरावर फेटाळली आणि वाढीव कामांचा मूळ प्रस्ताव संमत केला.