घरमहाराष्ट्रराष्ट्रगीत येईना; भाजप वक्त्याकडून राष्ट्रगीताचा अपमान

राष्ट्रगीत येईना; भाजप वक्त्याकडून राष्ट्रगीताचा अपमान

Subscribe

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच राष्ट्रगीताचा अपमान झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. भाजपच्याच एका कार्यकर्त्याने हा अपमान केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

देशभर राष्ट्रभक्तीचा डंखा पिटणाऱ्या भाजपच्याच एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रगीताचा अपमान झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अपमान दुसऱ्या तिसऱ्या कुणी केला नसून भाजपच्याच एका कार्यकर्त्या वक्त्याने केला असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि सर्वात कहर म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये आणि भाजपच्या इतर मंत्रिमंडळी स्टेजवर असताना हा अपमान करण्यात आला आहे. सीएम चषक स्पर्धेच्या एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला असून त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उभ्या असलेल्या सामान्य लोकांसोबतच स्टेजवर राष्ट्रगीतासाठी उभ्या असलेल्या मान्यवरांचीही चांगलीच पंचाईत झाली.


तुम्ही हे वाचलंत का? – काय आहे राज ठाकरेंच्या या बदलत्या स्वरूपाचा ‘राज’!

- Advertisement -

काय होता कार्यक्रम?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाखाली सीएम चषक स्पर्धा राज्यभर भरवण्यात येत आहेत. त्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी विद्याचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एका जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजपचे इतर नेते उपस्थित होते. त्याचसोबत इतर मान्यवरही हजर होते. समोर शेकडोंचा जमाव होता. आणि अशात कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या वक्त्याने कार्यक्रमाचा शेवट होत असल्याचं जाहीर केल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शेवट करण्याचं ठरलं. तशी घोषणाही झाली आणि तिथेच हा भयंकर प्रकार घडला.


हेही वाचा – आणि राज ठाकरे ढाब्यावरच थांबले जेवायला!

- Advertisement -

का झाला राष्ट्रगीताचा अपमान?

या महाभागाने राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली. मध्यापर्यंत राष्ट्रगीत व्यवस्थित म्हटलं गेलं. पण पुढे त्याची गाडी घसरली. मध्ये काही ठिकाणी त्याने आठवत नसल्यामुळे स्वत:च्याच पदरचे शब्द घुसडले. शेवटी तर त्याला पुढचं राष्ट्रगीत आठवेचना. त्यामुळे मग स्वत: मुख्यमंत्री आणि स्टेजवरच्या इतर मान्यवरांनी त्याला मदत करायला सुरुवात केली. आत्तापर्यंत अत्यंत हळू आवाजात राष्ट्रगीत म्हणणारी स्टेजवरची मंडळी मोठ्याने राष्ट्रगीत म्हणू लागली. आणि कसंतरी करून राष्ट्रगीत संपलं. पण या प्रकारामुळे तमाम जनतेसमोर त्या कार्यकर्त्याची, स्वत: मुख्यमंत्र्यांची आणि भाजपची नाचक्की तर झालीच, पण राष्ट्रगीताचा अपमानही झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या कार्यकर्त्यावर काय कारवाई करण्यात आली, हे जसं व्हिडिओमधून समजू शकलेलं नसलं, तसंच या घडलेल्या घोर प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचंही कुठेही स्पष्ट झालेलं नाही.

व्हिडिओ पहा: देशाला राष्ट्रवाद शिकवणाऱ्या भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना 'राष्ट्रगीत' सुद्धा माहित नाही. सध्या राज्यातील विविध शहरांमध्ये भाजपच्या युवामोर्चातर्फे 'सीएम चषक' भरविण्यात आला आहे. त्यादरम्यान घडलेला हा प्रकार आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता होत असताना भाजपच्या या युवा कार्यकर्त्यांनी भारताचा स्वाभिमान असलेल्या राष्ट्रगीतातील शब्दांचा अक्षरशः स्वतःला हवा तसा खेळ मांडला. आणि हेच भाजपचे युवक समाज माध्यमांवर देशाला राष्ट्रवाद शिकवत असतात हे वास्तव आहे.#BJP #Nationality #NationalAnthem

Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Sunday, 4 November 2018

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -