घरमहाराष्ट्रमला संपवण्याचा प्रयत्न; लवकरच अनेक गोष्टींचा उलगडा करणार - एकनाथ खडसे

मला संपवण्याचा प्रयत्न; लवकरच अनेक गोष्टींचा उलगडा करणार – एकनाथ खडसे

Subscribe

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे सातत्याने त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत. एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता लक्ष्य केलं आहे. मला पूर्णपण संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही, लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा करेन, असा इशारा त्यांनी दिला आहे.

“मी मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असल्यामुळे मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही. मी स्वस्थ बसणार नाही. माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणता घोटाळा केलेला नाही. अनेकांवर घोटाळ्यांचे आरोप झाले मात्र सर्वांना क्लीन चिट मिळाली. मग मला का क्लीनचिट दिली नाही. लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होईल,” असा इशारा एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचं नाव न घेता दिला. मी असा काय गुन्हा केला. जे लोक या विधानसभेच्या निवडणुकीत आडवे येत होते, असा सवाल देखील त्यांनी केला.

- Advertisement -

इतर नेत्यांवर कारवाई होत नाही. मग माझ्यावर का कारवाई करण्यात आली? असा सवाल खडसे यांनी केला आहे. माझ्यावरचे खोटे आरोप आतापर्यंत सिद्ध करू शकलेले नाहीत. बदनाम करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी मीडिया ट्रायल केली होती. जाणीवपूर्वक मला पदावरून बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आले. भ्रष्ट लोकांना पक्षामध्ये घेतले. मात्र ज्यांनी चाळीस वर्ष जिवाचं रान केले त्यांच्या जीवाची कदर नाही का?, असं खडसे म्हणाले.

मला बदनाम करण्याचं शल्यं माझ्या मनात आहे. नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे भाजपचं सरकार येऊ शकलं नाही. ओबीसींवर अन्याय, बहुजनांवर अन्याय करण्यात आल. बहुजनांची तिकीटं कापली. ज्यांना तिकीटं दिली त्यांना हरवलं. माझं तिकीट कापलं, माझ्या मुलीला हरवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. याबबतचे सर्व पुरावे मी दिले असून देखील कारवाई होत नाही?” असं खडसेंनी सांगितलं. मी कधीच पक्षावर टीका केली नाही. आम्ही कष्टाने आणलेलं भाजपचं सरकार गेल्याची खंत एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -