‘फडणवीस ड्राय क्लिनर, आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे’; खडसेंचा पुन्हा टोला

bjp seniro leader eknath khadse criticized devendra fadnavis
Advertisement

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाख खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना ड्राय क्लिनरची उपमा देत टीका केली आहे. एकनाथ खडसे यांच्या जीवनावरील सुनील नेवे लिखित पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्यात खडसे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टोला लगावला.

“आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधात तसंच नेत्यांच्या विरोधात कधीही बोललो नाही. मला देवेंद्रजी फडणवीसांकडून खूप त्रास झाला म्हणून बोलावं लागतंय. मी पक्षाच्या विरोधात कधीही बोलणार नाही. आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की सर्वांना क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?” असा सवाल त्यांनी विचारला आहे. “नाथाभाऊ अन्याय सहन करणार नाही. मला न्याय मिळत नाही तो पर्यंत मी पक्षाला प्रश्न विचारणार आहे,” असं एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमात लवकरच ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ हे पुस्तक लिहिणार असल्याची घोषणा केली. या पुस्तकातून अनेक गोष्टींचा उलगडा करणार आहे. दोन चार राजे लाचार झाल्याने इंग्रज बळकट झालेलं. या इतिहासाशी मिळती जुळती घटना आहे. मी पुस्तक लिहिण्याएवढा मोठा नाही, मात्र त्यांच्या प्रेमापोटी लिहिणार आहे. दाऊदच्या बायकोवरुन आरोप करण्यात आले. मनीष भंगाळेला सन्मानाची वागणूक दिली गेली. नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहिणार आहे. त्यात सगळे मी लिहिणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.