घरमहाराष्ट्रमुंबईत भाजपाच्या शक्तीकेंद्र प्रमुख संमेलनाला सुरुवात

मुंबईत भाजपाच्या शक्तीकेंद्र प्रमुख संमेलनाला सुरुवात

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपाच्या शक्तिकेंद्र प्रमुख संमेलनाला सुरुवात झाली असून, आगामी निवडणुकीत भाजपाची रणनीती काय असेल याची माहिती बूथ प्रमुखांना देण्यात येत आहेत.

असा असेल कार्यक्रम

  • ११ ते २५ फेब्रुवारी – शक्तिकेंद्र प्रमुख संमेलन
  • १२ ते ३ मार्च ‘मेरा परिवार भाजपा परिवार’

या कार्यक्रमातील या मुद्द्यावर असेल लक्ष

  • केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ ज्या लोकांना मिळाला त्या लोकांची नावे कार्यकर्त्यांना दिलेल्या किटमध्ये देण्यात आली आहेत. त्याचा प्रचार करणए
  • २६ कमल ज्योती संकल्प या अभियानात ६ ते ९ राज्यभर भाजपा दिवाळी साजरी करणार
  • २८ फेब्रुवारी – पंतप्रधान भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मंडळ स्थरावर कार्यक्रमाची योजना करावी, बूथ कार्यकर्ते आणि मोर्च्यातील कार्यकर्ते यांच्यासोबत व्हिडिओ कॅन्फरसीने पंतप्रधान बोलणार आहेत.
  • ३ मार्च मोटर सायकल महारॅली.
  • प्रत्येक बूथ वरच्या पाच मोटरसायकल धारकांची यादी तयार करणे हे यामधील मुख्य काम होते. ३ मार्चला मोटर सायकल चालकांची विजय संकल्प बाईक रॅली करायची आहे. २ आणि ३ मार्चला देशभरात होणार आहे.
  • प्रत्येक बूथ वरची मोटर सायकल आली पाहिजे, असे सांगण्यात आले आहे.
  • सर्वच्या सर्व बूथचे प्रतिनिधित्व ३६ विधानसभा क्षेत्रांमध्ये यादी काढली तर एक लाख लोकांची रॅली काढली पाहिजे, असे आवाहन भाजपाने केले आहे.
  • मोटर सायकल रॅलीतून वातावरण निर्माण करायचे आहे, असे आदेश भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
  • मन की बात मोदी के साथच्या माध्यमातून जनतेची मत घेतले जाणार. त्यानुसार जाहीरनामा तयार होणार. समाजाच्या सूचना दिल्लीमध्ये पाठवणार आहोत.
  • बूथ प्रमुखाची आयडी तयार केला जाणार.
  • पेज प्रमुखांना विना फोटोचे स्मार्ट कार्ड दिले आहेत.
  • बूथ प्रमुखांची कामे काय? याची माहिती मनोगतच्या अंकात दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -