भाजपने सुरु केलाय मंदिर-मस्जिदचा धंदा – छगन भुजबळ

Mumbai
Chhagan Bhujbal Parivartan Yatra
उल्हासनगर येथील परिवर्तन यात्रेदरम्यान छगन भुजबळ यांनी भाजपच्या धार्मिक राजकारणावर टीका केली.

विकासाचा मुद्दा बाजुला ठेवून भाजप सरकार मंदिर – मस्जिदचा मुद्दा घेवून धनाचा धंदा करत आहेत. वाईट याच गोष्टीचे वाटत आहे की यामध्ये सुशिक्षित लोक आंधळे बनत चालले आहेत. हा निवडणूक जुमला असून याकडे लक्ष देवू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी उल्हासनगर येथील जाहीर निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या उल्हासनगर येथील सभेत केले. भुजबळ पुढे म्हणाले की, यांना मंदिर नाही बनवायचे तर सरकार बनवायचे आहे. म्हणून मंदिराचा मुद्दा घेवून मंदिर मस्जिदचा मुद्दा घेवून दंगा घडवायचा आहे, असा आरोपही आमदार छगन भुजबळ यांनी केला.

हे मनुवादी सरकार

आज देशावर अशा लोकांचे राज्य आहे, जे लोक आदिवासींना आदिवासी नाही तर वनवासी समजत आहेत. आज मनुवादी विचारांचे पुरस्कार करणारे सरकार असल्याची टीकाही छगन भुजबळ यांनी केली.

हे वाचा – ‘जनतेसोबत धन की बात, अदानी, अंबानी सोबत धन की बात’

भ्रष्टाचारमुक्त करण्याऐवजी भ्रष्टाचारयुक्त – धनंजय मुंडे

भाजप सरकारला सत्तेत येवून चार वर्षे झाली परंतु भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याऐवजी उलट महाराष्ट्राला भ्रष्टाचार युक्त केला, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उल्हासनगर मधील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांवर केला. “महागाईने आज डोकं वर काढलं आहे. २०१४ पासून आजपर्यंत मोदींनी पेट्रोल च्या दरवाढीने ३१ रुपयांची लूट केली आहे. तुमच्या मनात फसवणूक करणाऱ्या या सरकार बद्दल चीड, संताप असेल तर हा संताप येत्या निवडणुकीत दाखवून द्या”, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here