घरताज्या घडामोडी'शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांना विधानसभा अध्यक्ष केले नाही' - चंद्रकांत पाटील

‘शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांना विधानसभा अध्यक्ष केले नाही’ – चंद्रकांत पाटील

Subscribe

भाजपमध्ये झालेल्या मेगाभरतीमुळे भाजपच्या संस्कृतीला धक्का बसल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर आज घुमजाव केले आहे. भाजपमध्ये सामुहिक निर्णय घेतले जातात, ही आमची संस्कृती आहे. बाहेरच्या पक्षातून आलेल्या नेत्यांना ही कार्यपद्धती कळावी, असे मी म्हणालो होतो. हे सांगत असताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. “शरद पवारांनी ठरविले की पृथ्वीराज चव्हाणांना विधानसभा अध्यक्ष करायचे नाही, तर त्यांना केले गेले नाही. आमच्यात असे होत नाही, सामुहिक निर्णय घेतले जातात”, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड येथे जिल्हाध्यक्ष पदाची निवड करत असताना पाटील यांनी भाजपमधील मेगाभरतीवर भाष्य केले होते. मेगाभरतीमुळे पक्षातील संस्कृती बिघडली, नेत्यांच्या जवळ असणाऱ्यांना पदे देण्याची पद्धत सुरु झाली असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मेगाभरती चुकीची नसल्याचे म्हटले होते. यानंतर आज पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांनी आपली बाजू मांडली. भाजप हा नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.

- Advertisement -

 

भाजपमध्ये २०१४ ते २०१९ या काळात जे जे कुणी इतर पक्षातून आले, त्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचा आम्हाला उपयोग, फायदा झालेला आहे. सरकार आले नाही तरिही पक्षात आलेल्यापैंकी एकही माणूस बाहेर गेलेला नाही. हे सर्व आमच्या पक्षात येताना बरीच वर्ष दुसऱ्या पक्षात होते. त्यामुळे येताना ते त्यांची कार्यपद्धती घेऊन आले होते. मी असे म्हणालो होतो की, त्यांना भाजपच्या कार्यपद्धतीची ओळख करुन दिली पाहीजे. कारण भाजप वगळता इतर सर्व पक्ष हे व्यक्तिंच्या आहेत. शिवसेना ही ठाकरेंची, काँग्रेस गांधी परिवाराची, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची. फक्त भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. बाहेरून आलेल्या नेत्यांना हे समजावून सांगावे लागेल, एवढेच मी म्हणालो होतो. सामुहिक निर्णय घ्यायची त्यांच्यात पद्धत नाही. मात्र भाजपमध्ये कोअर कमिटी असते ती सामुहिक पद्धतीने निर्णय घेते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -