घरमहाराष्ट्रभाजपने सुरु केली ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मोहिम

भाजपने सुरु केली ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मोहिम

Subscribe

तरुण पिढीसोबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपल्या पक्षासोबत जोडण्यासाठी भाजपने डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेची सुरवात केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने आता नवीन मोहिम सुरू केली आहे. तरुण पिढीसोबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपल्या पक्षासोबत जोडण्यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेची सुरवात केली आहे. या मोहिमेला लवकरात लवकर तळागाळापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न भाजपने सुरु केले आहेत. त्यासाठी सोशल मीडियातील फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, अँड्रॉइड फोनचा आधार घेतला जात आहे. तरुणांना या मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देशातील तरुण पिढीचा दृढ विश्वास आहे. या विश्वासाला अधिक मजबूत करण्यासाठी डिजीटल प्लॅटफॉर्मवर ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ ही मोहिम सुरु करण्यात आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

‘कार्यकर्त्यांचा सन्मान फक्त भाजपात होतो’

‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ मोहिमेची सुरुवात करताना भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान हा फक्त भाजपमध्ये मोठ्याप्रमाणत होतो. त्यामुळे भाजपने कार्यकर्त्यांना प्राधान्य देत ही डिजीटल मोहिम सुरु केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी दिली. ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरुणांची एक नवीन फौज तयार करण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या बहुसंख्य मतदारांचा समावेश असणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

- Advertisement -

पहिल्याच दिवशी ८ हजार २७९ कार्यकर्त्यांचा सहभाग

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर देशातील तरुण पिढीचा विश्वास आहे. त्याचबरोबर भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून, तो देशातील तरुणांना नवी दिशा देण्याचे सातत्याने काम करत आहे. या तरुण पिढीचा भाजपवर दृढ विश्वास आहे. त्यामुळे ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यात या मोहिमेत पहिल्याच दिवशी ८ हजार २७९ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आणि ते भाजपचे सदस्य झाले. येत्या तीन दिवसांत ही संख्या अडीच लाख होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

कॉलेजमधील तरुणांना आकर्षित करण्यासाठी मोहिम

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नव्या भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये डिजिटल इंडीया आणि तरुण पिढीचा मोठा सहभाग असणार आहे’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ या मोहिमेअंतर्गत भाजपचे सर्वाधिक लक्ष हे कॉलेजमधील तरुणांवर असणार आहे. हे तरुण आहेत, जे मतदार तर झाले आहेत मात्र ते अद्यापही कोणत्याही पक्षाचे सदस्य झालेले नाहीत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रयत्न आहे की, या तरुणांचे पहिले मत हे भाजपला मिळावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यात सहभागी व्हावे. त्यामुळेच ‘कार्यकर्ता कर्ताधर्ता’ हि मोहिम डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री आणि उद्धवजींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -