घरमहाराष्ट्रपुणेः महापौरपदी भाजपचे मोहोळ; तर उपमहापौरपदी शेंडगे यांची निवड

पुणेः महापौरपदी भाजपचे मोहोळ; तर उपमहापौरपदी शेंडगे यांची निवड

Subscribe

एकाच पंचवार्षिक कालावधीत स्थायी समितीचे अध्यक्ष पद आणि महापौर पद मिळालेले ते पहिलेच नगरसेवक ठरले

पुण्याच्या महापौरपदी भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांची शुक्रवारी निवड झाली. एकाच पंचवार्षिक कालावधीत स्थायी समितीचे अध्यक्ष पद आणि महापौर पद मिळालेले ते पहिलेच नगरसेवक ठरले आहे. उपमहापौरपदी भाजपच्या नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची निवड झाली. तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले. भाजपला महापालिकेत स्पष्ट बहुमत असल्याने मोहोळ आणि शेंडगे यांची निवडीची औपचारिकता बाकी होती.

या दोन पदाच्या निवडीसाठी सर्वसाधारण सभा ही शुक्रवारी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगांवकर यांनी काम पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश कदम यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना ५९ मते मिळाली. तर मोहोळ यांना ९७ मते मिळाली. मनसेचे दोन्ही नगरसेवक तटस्थ राहिले. पाच जण गैरहजर राहिले. महापौर मुक्ता टिळक यांचा कार्यकाल संपल्यामुळे निवडणुक होत आहे.

- Advertisement -

भाजपमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच

गेल्या आठवड्यात झालेल्या महापौर पदाच्या सोडतीमध्ये पुणे महापालिकेची जागा खुला वर्गासाठी आरक्षित झाली होती. त्यामुळे भाजपमध्ये महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच होती. यामध्ये मोहोळ यांचे नाव आघाडीवर होते. संघटनात्मक काम, तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडुन आल्याचा अनुभव, स्थायी समितीचे अध्यक्ष पदही त्यांनी भुषविले होते. कोथरुड विधानसभा मतदारसंघातूनही ते उमेदवारीसाठी इच्छुक होते. उमेदवारीत डावलेले गेल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी महत्वपुर्ण योगदान दिले होते. मोहोळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी पक्षाने मोहोळ यांना महापौरपदाची संधी दिल्याची चर्चा आहे.


मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -