घरमहाराष्ट्रनेत्रहिन विद्यार्थ्यांनी बनवली ब्रेल लिपीत शुभेच्छापत्रे

नेत्रहिन विद्यार्थ्यांनी बनवली ब्रेल लिपीत शुभेच्छापत्रे

Subscribe

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मेणपणत्या, शुभेच्छापत्रांना पंढरपूरसह परिसरातील गावांतून चांगली मागणी आहे.

लायन्स क्लब संचलित निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी दीपावलीनिमित्त विक्रीसाठी मेणपणत्या, खास ब्रेल लिपीतील शुभेच्छा पत्रे तयार केली आहेत. १५ वर्षांपासून या शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मेणपणत्या, शुभेच्छापत्रांना पंढरपूरसह परिसरातील गावांतून चांगली मागणी आहे. बाजारातही पणत्या शुभेच्छापत्रे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शहरातील अनेक कुटुंबीय अंधशाळेतील मुला-मुलींनी तयार केलेल्या खास ब्रेल लिपीतील शुभेच्छापत्रे, मेणपणत्यांना विशेष पसंती देत आहेत.

हेही वाचा – आदिवासी विद्यार्थ्यांच्या ‘मिशन शौर्या’पुढे एव्हरेस्ट ठेंगणे

- Advertisement -

विद्यार्थ्यांनी दोन हजार शुभेच्छापत्रे बनवले

विद्यार्थी महिनाभरापासून मेणपणत्या, शुभेच्छापत्रे तयार करण्याचे काम करत होते. त्या तयार झाल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. यंदा प्रत्येकी दहा रुपयांना शुभेच्छापत्रे तर ५० रुपये देणगी मूल्यावर एक डझन मेणपणत्यांचे पाकीट उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी दोन हजार शुभेच्छापत्रे, एक हजार पाकीट मेणपणत्या बनवल्या आहेत. ब्रेल लिपीतील शुभेच्छापत्र असल्याने नागरिकांना पोस्ट खात्यामार्फत टपाल तिकीट न लावता ते विनामूल्य पाठवता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलेस वाव मिळावा या उद्देशाने शहरवासीयांसह विविध संस्था, समाजातील मान्यवर व्यक्ती मेणपणत्या, शुभेच्छापत्रे खरेदी करत आहेत. मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी घोडके यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण दिले.


हेही वाचा – डोंबिवलीत विद्यार्थीनीच्या अपहरणाचा डाव फसला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -