घरताज्या घडामोडीकोरोनाच्या संकटात हॉस्पिटलसाठी दुवा ठरतोय 'हा' दृष्टीहीन योद्धा

कोरोनाच्या संकटात हॉस्पिटलसाठी दुवा ठरतोय ‘हा’ दृष्टीहीन योद्धा

Subscribe
कोरोनाच्या महामारीच्या संकटात आरोग्य यंत्रणेतल्या कर्मचाऱ्यांकडून सुरू असणाऱ्या कामात प्रत्येक कोव्हिड योद्धाची मदत ही कोरोनाविरोधातील लढाईत महत्वाची ठरत आहे. पण आरोग्य यंत्रणेचा इतर जगाशी संवाद घडवून आणण्याचेही काम तितकेच महत्वाचे आहे. मग राजकीय पुढाऱ्यांचे येणारे फोन असो, एनजीओकडून मदतीची गरज असो वा अधिकाऱ्यांच्या फोनची लगबग असो आपले काम तंतोतंत करणारे व्यक्तीमत्व म्हणजे प्रवीण कांबळे. कोरोनाच्या संकटकाळात आपला खारीचा वाटा देण्याची भूमिका गोकुळदास तेजपाल रूग्णालयातील दृष्टीहीन दूरध्वनी चालक ते चोख बजावत आहेत.
कोरोनाच्या कहरमुळे एकीकडे रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे भीतीच्या सावटाखाली आहेत. पण मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील  कर्मचारी असलेला दृष्टीहीन कर्मचारी कोरोना योद्धा  देवदूत बनवूनच कोरोना पेशंट साठी धावून आला आहे. डॉक्टर्स  -नर्स -सफाई कर्मचारी -रुग्णसेवक -तंत्रज्ञ्-सर्वच जण हाताला पडेल ते काम करत कोरोनाला हरवायचे  हेच उद्दिष्ट  सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. तसेच जगाचा संवाद घडवून देण्याचे महत्वाचे काम त्यांच्याकडून होत आहे.
दृष्टीहीन असतानाही एक योद्धा कोरोना या महामारीच्या लढाईत प्रवीण कांबळे यांनी एकहाती किल्ला लढवला आहे. रुग्णालयातील आवारामध्ये  राहणारे  सर्वांशी अगदी अदबीने वागणारे,  आपल्या कर्तव्याला  प्रथम प्राधान्य  देणारे  आणि कठीण प्रसंगी  त्यांच्या कडून होणारी  मदत ही खूप मोठी बाब त्यांच्या स्वभावातील आहे. कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडून ड्युटीवर येण्यासाठी चालढकल होत असतानाच दृष्टिहीन असल्याने कामावर येणार नाही अशी कोणतीही सबब त्यांनी इतक्या दिवसात रूग्णालयातील काम करताना दिलेली नाही.
अचूक माहिती  देऊन कोरोना पेशंटला मदत करणे हेच एकमेव ध्येय त्यांनी मनाशी बाळगले आहे असे त्यांनी सांगितले. कोरोना पेशंटची सेवा करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनमध्ये माझे खूप जवळचे  मित्र आणि रुग्णालयीन  कर्मचारी यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले आहे. माझ्या  दृष्टीने  अंधारातील  चकाकणारा हिरा प्रवीण कांबळे त्याच्या कर्तुत्वाला माझा सलाम असे  रुग्णालयातील चंद्रकांत माधव निमाळे यांनी सांगितले.

रवींद्र भोजने  (लेखक हे मुक्त पत्रकार आहेत)


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -