करोनोग्रस्तांच्या मदतीसाठी ‘एक थेंब जीवदानाचा’ संकल्पनेतून पनवेलमध्ये ‘रक्तदान पंधरवडा सुरु!

राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार 'आपण सारे मिळून' पनवेल, कामोठे आणि खांदा कॉलनी येथे 'रक्तदान पंधरवडा' ही संकल्पना उद्यापासून अर्थात गुढीपाडवा, २५  मार्चपासून सुरु केली आहे.

Panvel
Don't be fear to donate blood for fear of coronavirus
करोनाच्या भीतीने रक्तदान करण्यास घाबरू नये

राज्यात करोना आणि साथीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत असताना रक्त साठ्याचा तुटवडा जाणवत  आहे. राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘आपण सारे मिळून’ पनवेल, कामोठे आणि खांदा कॉलनी येथे ‘रक्तदान पंधरवडा’ ही संकल्पना उद्यापासून अर्थात गुढीपाडवा, २५  मार्चपासून सुरु केली आहे.
रक्तदान करून महाराष्ट्रात करोनाविरुद्ध गुढी उभारण्याची सेवा आपण करू शकतो. २५  मार्च ते ९  एप्रिलपर्यंत दररोज सकाळी १०  ते ०२  वाजेपर्यंत रक्तदान आपल्याला करता येणार आहे . गर्दी टाळण्यासाठी श्री साई ब्लड बँक, ठाणा नाका, प्रांत कार्यालयाजवळ, पनवेल ०२२२  ७४५  ०८८५ ,०२२२  ७४६  ७८५६ , रोटरी क्लबची लिमये ब्लड बँक खांदा कॉलनी केंद्र डॉ. प्रकाश दिवे: ९८६७८८०७०५ , ०२२२  ७४५  ९३२२ ,एमजीएम कामोठे हॉस्पिटल, कळंबोली सर्कलजवळ  रवींद्र आतरणे ९८१९३५१७२३, कांतीलाल प्रतिष्ठान ८०८०३१८३३८  क्रमांकावर रक्तदात्याने नाव नोंदवायचे आहे. त्यानंतर रक्तदात्यांना  मेसेज येणार आहे. वार, तारीख आणि वेळ कळविण्यात येणार असून त्या वेळातच रक्तदात्यानी रक्तदानासाठी यायचे आहे.

‘रक्तदान पंधरवडा’ ही संकल्पना कृतीत उतरवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन इंडीयन मेडिकल असोशियशन आणि कांतीलाल प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदात्याला रक्तदान केंद्रापर्यंत जाताना कोणताही अडसर न येण्यासाठी यासंदर्भात संबंधित पोलिस यंत्रणा आणि महापालिकेला माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here