घरमनोरंजनबॉलीवूडच्या या ११ महारथींचं आवाहन; करोनाशी असं लढुयात!

बॉलीवूडच्या या ११ महारथींचं आवाहन; करोनाशी असं लढुयात!

Subscribe

बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार करोना व्हायरसवर मात करण्यासाठी आवाहन करत आहे.

चीनमधून आलेल्या करोना व्हायरसने जगभरात हजारो बळी घेतले आहेत. भारतात आत्तापर्यंत २२५ करोनाबाधित रुग्ण असून महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे ५२ जणांना करोना व्हयरसची लागण झाली आहे. असे असताना महाराष्ट्र सरकार जनजागृतीसाठी पुरेपुर प्रयत्न करताना दिसत आहे. करोनाबाबत जनजागृतीसाठी बॉलिवूड कलाकारांनीही पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन आज एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला. या व्हिडिओत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार करोना व्हायरसवर मात करण्यासाठी आवाहन करत आहे. सोबतच काय काय काळजी द्यावी, काय करावे, काय करू नये याबद्दल हे कलाकार सांगत आहे. जवळपास पावणेदोन मिनिटांच्या या व्हिडिओत बॉलिवूडचे तब्बल ११ कलाकार आहेत. यात अमिताभ बच्चन, अनिल कपूर, माधुरी दीक्षित-नेने, रणवीर सिंग, शिल्पा शेट्टी-कुंद्रा, वरून धवन, अर्जुन कपूर, आलिया भट, अजय देवगण आणि अक्षय कुमार इत्यादी दिग्गजांनी करोनाशी लढण्याचं आवाहन केलं आहे.

पहा संपूर्ण व्हिडिओ

 काय केलं आवाहन?

या व्हिडिओमध्ये सर्व  कलाकारांनी विविध गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. त्यात व्यक्तिगत स्वच्छता राखावी, साबणाने हात वारंवार धुवावेत,खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरावा,अल्कोहोलयुक्त हॅन्ड सॅनिटायझर वापरावे,वजन कमी करण्यासाठी डाएट न करता पौष्टिक आहार घ्यावा,अनावश्यक प्रवास टाळावा,लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी, करोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपासून १ मीटर अंतर ठेवावे, हात न धुता चेहरा,तोंड आणि डोळ्यांना हात लावू नये, सरकारने सांगितलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं  तरच आपण करोनावर मात करू शकू असे आवाहन या दिग्ग्नज बॉलिवूडकरांनी केले आहे. रोहित शेट्टी पिक्चर्सने या व्हिडिओची निर्मिती केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -