घरमहाराष्ट्रवडगावशेरी येथील सीमा भिंत पावसामुळे कोसळली

वडगावशेरी येथील सीमा भिंत पावसामुळे कोसळली

Subscribe

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी नाही

सध्या पुण्यात पाऊस कोसळत असून पुण्यात शुक्रवारी एक भींत कोसळण्याची घटना घडली. पुण्यातील वडगावशेरी येथील करण घरोंदा या सोसायटीची सीमा भिंत रात्री झालेल्या प्रचंड पावसाने कोसळली. यामध्ये ८ दुचाकी व १ चारचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. पुणे शहरात कोंढवा, आंबेगाव येथील सोसायटीची सीमा भिंत कोसळण्याची घटना ताजी असतानाच आता वडगावशेरीतील सोसायटीची भिंत पडल्याने शहरातील पुन्हा एकदा भिंतीच्या बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -