घरताज्या घडामोडीसंबंध ठेवता न आल्याने प्रियकर चवताळला आणि...

संबंध ठेवता न आल्याने प्रियकर चवताळला आणि…

Subscribe

'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या युवकाला संबंधात अडथळा आल्याने युवक चवताळला होता.

यवतमाळ जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुण – तरुणीची मैत्री झाली होती. ही मैत्री इतकी घट्ट झाली की, या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. तसेच प्रियकरांनी देखील प्रियसीला मी तुझ्याशीच लग्न करणार असे आमिष दाखवले. त्यामुळे दोघे एकमेकांसोबत सातत्याने राहत होते. फिरत होते. नंतर त्यांनी तिला तू आपल्यासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच आपल्यासोबत आपला प्रियकर लग्न करणार असल्यामुळे तिनेही विश्वासाने त्याला होकार दिला. मात्र, युवतीची हीच एक चूक तिच्या जिवावर बेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव कोरंबी येथील २८ वर्षीय सूरज मुसळे याचे एका युवतीवर प्रेम झाले. त्यानंतर भेटीगाठी वाढल्या, दररोज फिरणे झाले, हॉटेलमध्ये बसणे असे नित्याचेच झाले आणि त्यांचे नाते अधिकच घट्ट झाले. त्यानंतर दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

दरम्यान, सूरने युवतीला पळवून आपल्या घरी घेऊन गेला आणि लिव्ह इनमध्ये राहू लागला. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याने शारीरिक संबंध रोजच ठेवले जात होते. एकेदिवशी युवतीला आईची आठवण आली. यामुळे ती सूरजला न सांगता निघून गेली. यामुळे चिडलेल्या सूरजने तिला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. युवतीच्या तक्ररीवरुन वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंध ठेवता न आल्याने चवताळला

सूरज आणि युवती एकत्र राहत असल्याने दोघांमध्ये शारीरिक संबंध ठेवणे नित्याचेच झाले होते. मात्र, तरुणीला आईची आठवण आल्याने ती आईला भेटण्यासाठी गेली. याची सूरजला कल्पना नव्हती. त्याला संबंध ठेवता न आल्याने सूरज चवताळला होता. दरम्यान, युवती आल्यानंतर सूरजने तिला आईच्या घरी का गेली असा जाब विचारला आणि तिच्या अंगावर बसून विषाची बॉटल तिच्या तोंडात ओतली. तसेच ठार मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी पीडितिने वणी पोलीस ठाण्यात सूरज मुसळे याच्याविरोधात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – क्वॉरंटाईन सेंटरमध्ये भाजीत आढळला विंचू; ४ जणांची बिघडली तब्येत


 

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -