घरमहाराष्ट्रसिंचन नाही तर मतंही नाही; भंडारा-गोंदिया पोटनिवडणूकीवर बारा गावांचा बहिष्कार

सिंचन नाही तर मतंही नाही; भंडारा-गोंदिया पोटनिवडणूकीवर बारा गावांचा बहिष्कार

Subscribe

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत तब्बल बारा गावच्या मतदारांनी पोटनिवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. चांगल्या दर्जाच्या सिंचनासाठी केलेली मागणी मान्य न केल्याने बारा गावच्या गावकरऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. ‘बावनथडी प्रकल्प संघर्ष समिती’ नावाच्या स्थानिक संघटनेने ग्रामसभेत प्रस्ताव मांडला होता कि, जर गावकऱ्यांची सिंचन सुविधेची मागणी मान्य झाली नाही, तर त्यांनी त्यांच्या भागात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालावा. त्या प्रस्तावाला तब्बल बारा गावच्या गावकऱ्यांनी प्रदिसाद देत आगामी २८ मे ला होणाऱ्या गोंदिया – भंडारा पोटनिवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

बावनथडी प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांनी सांगितले की, बावनथडी सिंचन प्रकल्पाअंतर्गत मार्च मध्ये या गावांना योग्य पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले होते.
मात्र प्रशासन आणि सरकारला त्यांच्या या मागण्यांची काळजी नसून, प्रशासन जाणून-बुजून या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप समिती अध्यक्ष गाढवे यांनी केला.

- Advertisement -

२३ मार्च रोजी समिती अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली गोबरवाही गावात आंदोलन करण्यात आले. त्या आंदेलना नंतर तुमसर तालुका अंतर्गत येणाऱ्या बारा गावच्या मतदारांनी आगामी निवडणूकिवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

पोटनिवडणूकीवर बहिष्कार टाकण्याऱ्या गावांची नावे पुढिल प्रमाणे –
गणेशपूर, पवणारखारी, गोबरवाही, येदरबुची, सुंदरटोला, सीतासवंगी, गुद्री, खंडाळ, सोधेपुर, हेटी, भामनेवाडा आणि खैरतोला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -