शेतकऱ्याने मुलीचा हट्ट केला पुर्ण, लग्नानंतर पाठवणी केली चक्क हेलिकॉप्टरने!

Nanded

सध्या आपल्या विवाह हटके पध्दतीने करण्याचा ट्रेंड सुरू आहे. प्रत्येकजण आपला विवाह अविस्मरणीय होण्यासाठी प्रयत्न करत असतो. असाच लग्नसोहळा अर्धापूर तालु्क्यातील एका शेतकरी कुटुंबाने लेकीच्या लग्नात वरात अन पाठवणीसाठी चक्क हेलिकॉप्टर बुक केले होते. रविवारी कोंढा गावी हा लग्नसोहळा पार पडला. अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावचे सरपंच असलेले रामराव बाबूराव कदम यांची बहीण शिल्पा कदम हिचा विवाह उखळीचे मोहन गायकवाड यांच्याशी झाला. बहिणीच्या इच्छेप्रमाणे लग्नात वरात आणि पाठवणीसाठी हेलिकॉप्टर आणले. कोंढा गावातून मंगल कार्यालयापर्यंत नववधूला हेलिकॉप्टरने आणण्यात आले आणि तीची पाठवणीही हेलिकॉप्टरने करण्यात आली.

कदम यांची मुलगी शिल्पा हिचा विवाह हिंगोली जिल्हयातील उखळी गावच्या मोहन गायकवाड या तरुणासोबत झाला. आपल्या विवाहात हेलिकॉप्टरने वरात निघवी अशी इच्छा शिल्पा हिने शेतकरी वडील नारायण कदम आणि भाऊ रामराम कदम यांच्याकडे बोलून दाखवली. तेव्हा मुलीची ही ईच्छा पूर्ण करण्याचे वडील आणि भावाने ठरवले. त्यानुसार कोंढा गावातून वधू- वराची वरात पिंपळगाव येथील मंगल कार्यालयापर्यंत आली. लग्न सोहळा झाल्यानंतर नवरदेवाच्या उखळी या गावापर्यंत नवरी – नवरदेवाची पाठवणी करण्यात आली. हेलिकॉप्टरसाठी कदम कुटुंबियांना तब्बल आठ लाख रुपये खर्च आला. पण मुलीच्या इच्छेसाठी वडिलांनी तिची ही इच्छा पूर्ण केली. या विवाह सोहळ्याला काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण याही उपस्थित होत्या.

लग्न झाल्यानंतर सगळ्या पंचकोशीत चर्चा रंगली होती ती हेलिकॉप्टरची आणि त्यातून जाणाऱ्या नवरी-नवरेदावांची. या नवदाम्पत्याला निरोप देण्यासाठी अख्ख कुटुंब हेलिपॅडवर जमलं होतं. अर्धापूर भागात कॅनॉलचं पाणी येत असल्यामुळे ऊस आणि हळद ही नगदी पीकं घेतली जातात. त्यामुळे हा भाग सधन आहे. कुटुंबातल्या सगळ्यांची इच्छा असल्याने आणि शेतकरीही काहीतरी करू शकतो हे दाखवायचं असल्याने लग्नात हेलिकॉप्टर आणल्याचं मुलीचे वडिल नारायण राव कदम यांनी सांगितलं.