घरमहाराष्ट्रब्रिटिशकालीन विहिरीचे पुनरुज्जीवन

ब्रिटिशकालीन विहिरीचे पुनरुज्जीवन

Subscribe

माथेरान नगर परिषदेचा पुढाकार

ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या कितीतरी गोष्टीचा आपल्याला आजही फायदा होत आहे, असे वेळोवेळी अनुभवास येत असताना आता पाण्याचा तुटवडा भासत असताना तहान भागवण्यासाठी एका ब्रिटिशकालीन विहीर सहाय्यभूत ठरली आहे. येथील पशुवैधकीय दवाखान्याला लागून एक साठ फूट खोल विहीर असून ती शंभर वर्षे जुनी आहे. महत्त्वाचे म्हणजे या विहिरीला बारमाही पाणी आहे. या पेमास्टर विहिरीला पुनरुज्जीवित करण्यात नगर परिषदेला यश आले आहे. या सफाई करून नगर परिषदेने तिला गतवैभव प्राप्त करून दिले आहे.1923 मध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या या पेमास्टर विहिरीचे आतून दगडाने बांधकाम करण्यात आले आहे. त्यामध्ये पाइप टाकून पम्पाद्वारे पाणी बाहेर काढले जायचे. मे महिन्यात हे पाणी टंचाईच्या काळात नागरिकांना पिण्यासाठी पुरविण्यात येत असे.

1990 नंतर ही विहीर नगर परिषदेकडून बंद करण्यात आली. मात्र तीस वर्षांनंतर पर्यटक व नागरिकांची संख्या लक्षात घेता यावर्षी मे महिन्यात पाणी टंचाई भासू लागली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी या विहिरीकडे नगर परिषदेचे लक्ष वेधले.जमिनीच्या वरच्या बाजूला असलेला भाग तोडून तो जांभा दगडाने हेरिटेजनुसार बनविण्यात आला आहे. तसेच पंप लावून सर्व दुर्गंधी युक्त पाणी बाहेर काढले आहे. त्यामधील सर्व घाण बाहेर काढून ही विहीर स्वच्छ करण्यात आली असून त्यात नवीन पाइप सोडून ते पम्पिंग मोटरला लावले जाणार आहेत. तसेच पाणी साठवण्यासाठी दोन टाक्या बसविण्यात येणार आहे, अशी माहिती विहिरीची दुरुस्ती करणारे दिलीप सकपाळ यांनी दिली.चौकटया विहिरीला पुनरुज्जीवित करण्याबाबत आम्ही नगर परिषदेत ठराव केला होता. तसेच यावर्षी माथेरानकरांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या. त्यानंतर या विहिरीची सफाई व पुनर्बांधणी सुरू केली.-प्रसाद सावंत, सभापती, बांधकाम समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -