घरमहाराष्ट्रवीज पुरवठा तोडल्याने बीएसएनएल ठप्प

वीज पुरवठा तोडल्याने बीएसएनएल ठप्प

Subscribe

गलथान कारभाराबद्दल ग्राहकांच्या रोषास सामोरे जात असलेल्या भारतीय संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) येथील कार्यालयाचा वीज पुरवठा बिल न भरल्याने खंडित करण्यात आला. त्यामुळे बीएसएनएलची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.

कधी काळी या भागासह तालुक्यातच नव्हे तर इतरत्रही इंटरनेट व दूरध्वनी सेवेसाठी बीएसएनएलशिवाय ग्राहकांचे पान हलत नसे. मात्र अधिकार्‍यांच्या भोंगळ कारभारामुळे ही सेवा हळूहळू मोडीत निघाल्यासारखी झाली. ग्राहक अन्य कंपन्यांच्या सेवांकडे वळू लागले. त्यामुळे ग्राहकांची संख्या आता काही शेकड्यापर्यंत खाली उतरली आहे. त्यातच येथील कार्यालयाने महावितरण कंपनीचे पाच लाखांपेक्षा अधिक बिल गेल्या सहा महिन्यांपासून भरले नसल्याने वीज पुरवठा तोडण्यात आला आहे. परिणामी उरल्या सुरल्या ग्राहकांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी चार दिवसांपासून बंद आहेत. तसेच याचा सर्वाधिक फटका बँकांमधील इंटरनेट सेवेला बसल्याने तेथील ग्राहकांचे हाल होत आहेत.

- Advertisement -

याबाबत बीएसएनएलच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे विचारणा केली असता वीज बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडून वीज बिल भरले जाणार असल्याचे स्पष्ट केले. तर महावितरणचे उप कार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी बीएसएनएल कार्यालयाच्या चार वीज जोडण्या आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून बिल भरले नसल्याने वीज खंडित करण्याची कारवाई करावी लागल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -