घरमहाराष्ट्रसाश्रू नयनांनी दिला वीरपुत्रांना अखेरचा निरोप

साश्रू नयनांनी दिला वीरपुत्रांना अखेरचा निरोप

Subscribe

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले महाराष्ट्राचे वीरपुत्र जवान संजय राजपूत आणि नितीन राठोड यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील वीरपूत्रांना आज दिल्लीहून त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले. मलकापूरचे सुपुत्र संजय राजपुत आणि बुलढाण्याचे जवान नितीन राठोर यांना आज साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. या जवानांचे पार्थिव दुपारी एकच्या दरम्यान दिल्लीहून औरंगाबादमध्ये दाखल झाले. औरंगाबाद विमानतळावर दाखल झाल्यावर शहिदांच्या पार्थिवांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शहिदांचे पार्थिव मूळगावी रवाना करण्यात आले. मलकापूरच्या नगरपरिषदेच्या मैदानात त्यांच्या शहीद जवान संजय राजपूत यांच्या १२ वर्षाच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. त्यापूर्वी लष्करी इतमामात त्यांनी सलामी देण्यात आली.

शोकाकूल वातावरणात अंतिम निरोप 

मलकापूरचे शहीद जवान संजय राजपूत यांचे पार्थिव वायू दलाच्या हेलिकॉप्टरने मलकापूरमध्ये आणण्यात आले. तसेच पार्थिव सर्वप्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले आणि तिथे त्यांना मानवंदना देण्यात आली. तेथून त्यांची फुलांनी सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी शहरात जागोजागी उभे असलेल्या नागरिकांनी या शूरवीराला अखेरचा सलाम केला. त्यांचे पार्थिव विवेकानंद आश्रमामध्ये ठेवण्यात आले. या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी आपल्या वीरपूत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. जवान संजय राजपूत अमर रहे च्या घोषणा दिल्या जात होत्या.

- Advertisement -

अमर रहेच्या घोषणा दिल्या 

मलकापूरमध्ये असा एकही कोपरा नव्हता जिथे श्रद्धांजलीचे पोस्टर लावले नव्हते. त्यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी रस्त्यावरच नाही तर जागोजागी नागरिकांनी गर्दी केली होती. यामध्ये तरूणांचा समावेश जास्त होता. तरुणांनी भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या. संपूर्ण शहरात शोककळा पसरली होती. पण शोकापेक्षा नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. शोक हा आपला सुपुत्र शहीद झाला म्हणून होता, तर तीव्र संताप हा पाकिस्तानांना प्रेरीत होऊन झालेल्या दहशतवागी हल्ल्यामुळे होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -