घरमहाराष्ट्रएसटी आणि ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तीन प्रवाशी जखमी

एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तीन प्रवाशी जखमी

Subscribe

पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे. या घटने प्रकरणी बस चालकाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. अंबादास दिनकर खेडकर, असे मृत्यू झालेल्या बस वाहकाचे नाव असून गंगाराम दिनकर सानप असे आरोपी बस चालकाचे नाव आहे. याप्रकरणी बस चालकाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

असा घडला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक या महामार्गावर एसटी बसने भरधाव वेगात रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या घटनेत बस मधील वाहक अंबादास यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे साडेचारच्या सुमारास झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की एसटीच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातग्रस्त बस साक्री धुळे आगर येथून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला आहे. अपघात पहाटे झाल्याने सर्व प्रवासी साखर झोपेत होते. दरम्यान, बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाण्यात गॅलरीचा भाग कोसळून महिला जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -